MB NEWS-परळीत ऐन 'दिवाळीत, किसान सभेचा कृषी कार्यालयासमोर 'शिमगा'

 परळीत ऐन 'दिवाळीत,  किसान सभेचा कृषी कार्यालयासमोर 'शिमगा' 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी..
         अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाई पोटी अग्रीम व पिक विमा देण्यात यावा या मागणीसाठी अ.भा. किसान सभेच्या वतीने परळीत कृषी कार्यालयासमोर बोंब मारून आंदोलन करण्यात आले. सध्या दिवाळीचा सण सुरू असून ऐन दिवाळीत किसान सभेने केलेले 'शिमगा' आंदोलन लक्षवेधी ठरले मात्र तालुका कृषी अधिकारी कार्यालय सुट्टी नसतानाही बंद असल्याचे दिसून आले. सकाळी 11 वाजता सुरू झालेले आंदोलन बंद कार्यालयासमोरच सुरू होते. दुपारी एक दीडच्या सुमारास तालुका कृषी अधिकारी हे कार्यालयात आले.
      अतीवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची अँग्रीम रक्कम व पिक विम्याच्या मागणीसाठी परळी येथील तालुका कृषी कार्यालया समोर किसान सभेने ऐन दिवाळीच्या दिवशी मंगळवारी (ता.२५) बोंब मारो आंदोलन  आंदोलन केले. सकाळी अकरा वाजता शेतकरी आंदोलन सुरू झाले. तालुका कृषी कार्यालय दुपारी एक वाजे पर्यंत बंद होते. दुपारी एक वाजता तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आले. शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी, ईडी सरकारच्या विरोधात बोंब मारून जोरदार आंदोलन केले.यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार