परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-अबब..! १० कोटीची म्हैस; रोज खाते ३० किलो हिरवा चारा

 अबब..! १० कोटीची म्हैस; रोज खाते ३० किलो हिरवा चारा

 

हरियाणा मेरठ येथील सरदार वल्लभभाई पटेल कृषी विद्यापीठात तीन दिवसीय अखिल भारतीय किसान मेळाव्याच्या पहिल्या दिवशी 10 कोटी गोलू किमतीची म्हैस आकर्षणाचे केंद्र ठरली. हरियाणातील पानिपत येथील रहिवासी असलेले पद्मश्री पुरस्कार विजेते शेतकरी नरेंद्र सिंह आपली म्हैस नावं गोलू टूला आणले.  गोलू या म्हैशीचे वय ४ वर्षे ६ महिने आहे. उंची सुमारे 5 फूट 6 इंच आणि लांबी 14 फूट आहे. त्याचे वजन 15 क्विंटल आहे.


नरेंद्र सिंह यांनी सांगितले की त्यांच्या म्हशीचे नाव गोलू टू आहे. कारण त्यांच्या आजोबांचे नाव गोलू वन होते. ते आजोबा गोलू वन पेक्षा अधिक वैभवशाली होते. म्हणून त्यांनी हे नाव त्यांच्या आजोबांच्या नावावर ठेवले. तसेच त्यांची म्हैस मुर्रा जातीची आहे.

गोलू ते म्हशीचे वजन 15 क्विंटल म्हणजेच 1500 किलो आहे आणि त्याचे वय 4 वर्षे 6 महिने आहे. नरेंद्र सिंह यांनी सांगितले की गोल  दररोज 30 किलो कोरडा हिरवा चारा, 7 किलो गहू आणि 50 ग्रॅम खनिज मिश्रण वापरतो. गोलू 2 चा रोजचा खर्च सुमारे 1000 रुपये आहे. गोलू 2 च्या शेणांतून त्यांना भरपूर कमाई होत आहे.


नरेंद्र यांनी म्हशीच्या जाती सुधारण्यासाठी हरियाणा सरकारची भेटही दिली होती. गोलू ला विविध यात्रेत आणण्या मागचा उद्देश शेतकऱ्यांना जागृत करणे आहे असे नरेंद्र सिंह यांनी सांगितले. तसेच नरेंद्र सिंह यांना 2019 मध्ये सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला होता.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!