MB NEWS-भगीरथ बियाणी यांचे निधन :आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द - खा.डाॅ. प्रितम मुंडे

 भगीरथ बियाणी यांचे निधन :आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द - खा.डाॅ. प्रितम मुंडे 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी......

          बीड भाजपचे शहराध्यक्ष आणि आमचे अत्यंत धडाडीचे कार्यकर्ते भगीरथ दादा बियाणी यांच्या दुःखद निधनामुळे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करत आहे अशी माहिती खा.डाॅ. प्रितम मुंडे  यांनी दिली आहे.

           बीडचे भाजप शहराध्यक्ष भागीरथ बियाणी यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आज सकाळी अकरा वाजण्याच्या राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून बियाणींनी आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.भागीरथ बियाणी यांनी राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. यानंतर कुटुंबियांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, यावेळेस डॉक्टरांनी बियाणींना मृत घोषित केलं. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून अधिक तपास करत आहेत. भागीरथ बियाणी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, भागीरथ बियाणी यांच्या आत्महत्येमागील नेमके कारण अदयाप समजू शकलेले नाही.या घटनेची माहिती कळताच खासदार प्रीतम मुंडे घटनास्थळी दाखल झाल्या. प्रीतम मुंडे ,कार्यकर्ते आणि पोलिसांशी संवाद साधून घटनेची माहिती जाणून घेतली.


      दरम्यान, पत्रकार, व्यापारी, महसूल, पोलीस अधिकारी तसेच राजकीय क्षेत्रात सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध असणारे भगीरथ बियाणी हे सामाजिक क्षेत्रात देखील अग्रेसर होते. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ते भाजपमध्ये गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत होते. मागील वर्षी त्यांची शहराध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या अकाली जाण्याने बीड जिल्हा भाजपात शोककळा पसरली आहे. दरम्यान आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करत आहे अशी माहिती खा.डाॅ. प्रितम मुंडे  यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार