MB NEWS-सौदागर कांदे शिक्षण महर्षी राज्यस्तरीय पुरस्कारासाने सन्मानित

 सौदागर कांदे  शिक्षण महर्षी राज्यस्तरीय पुरस्कारासाने सन्मानित





परळी (प्रतिनिधी. )   बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार  प्राप्त शिक्षक सौदागर आबाजीराव कांदे यांना मैत्रा फाउंडेशन बीडच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षण महर्षी पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल सौदागर कांदे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

    बीड येथील सामाजिक न्याय भावनात दिनांक 16 ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या या शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी निरंतर शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी विक्रम सारुक हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीकांत कुलकर्णी शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग बीड तसेच उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड, महिला तक्रार विभागाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेखा धस, वन विभागाच्या ससाने मॅडम, शिक्षक नेते राजेंद्र खेडकर मैत्रा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष द. ल. वारे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


      सौदागर कांदे हे परळी तालुक्यातील दगडवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे  एक उपक्रमशील तसेच विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून तालुक्यात लोकप्रिय आहेत. 5 सप्टेंबर रोजी बीड जिल्हा परिषदेने त्यांचा बीड जिल्हा परिषद आदर्श पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक संघटनांचे पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत.

    सौदागर कांदे यांनी परळी तालुक्यात विविध शाळांमध्ये काम करीत असताना त्यांनी गुणवत्ता पूर्ण शिक्षण व स्पर्धा परीक्षेचे गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ख्याती आहे. तसेच नावलौकिक मिळवला आहे. तसेच विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शनही त्यांनी केलेले आहे. , नवोदय, शिष्यवृत्ती,  एम.टी.एस यासारख्या परीक्षांमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना घडविले आहे. लोकसहभागातून शाळांचे डिजिटल तसेच रंगारंगोटी केलेली आहे. शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेलेच आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेव्हा कोरोनाची भयानक परिस्थिती होती अशा प्रसंगी ही कोरोना योद्धा म्हणून त्यांनी महत्त्वाची कामगिरी पार पाडली आहे. या त्यांच्या कार्यामुळे शाळेच्या वैभवात भर पडली आहे.

    

     सौदागर कांदे यांना मिळालेल्या शिक्षण महर्षी या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल  परळी तालुक्यात सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !