MB NEWS-अँड.मनोज संकाये मित्र मंडळांने निराधारासोबत साजरी केली दिवाळी!

 अँड.मनोज संकाये मित्र मंडळांने निराधारासोबत साजरी केली दिवाळी!

*दीपावलीचा फराळ आणि अन्नदान देऊन दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा !*


परळी वैजनाथ प्रतिनिधी


परळी येथील गुरुदास सेवा वृद्धाश्रम घाटनांदुर येथे येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली सामाजिक कार्यकर्ते अँड.मनोज संकाये आणि त्यांच्या मित्र मंडळाच्या वतीने आश्रमातील वृद्ध निराधारांसोबत फराळवाटप आणि अन्नदान करून दीपावली साजरी केली आणि त्यांच्या आशीर्वाद घेतले. तसेच वृद्धाश्रमातील महिला आणि पुरुष यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.


  सामाजिक कार्यात नेहमीच अँड.मनोज संकाये हे अग्रेसर असतात त्यांनी अल्पावधीतच सामाजिक कार्यात आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे. कोविड नंतर दीपावली सण हा अत्यंत उत्साहात यावर्षी साजरा होत असून त्याचा भाग म्हणून वृद्धाश्रमातील निराधार असलेले वयोवृद्ध महिला आणि पुरुष यांच्यासोबत त्यांनी दीपावली साजरी केली. तसेच तेथील वृद्धांना दीपावलीच्या फराळाचे वाटप करून अन्नदान करून आगळीवेगळी दिवाळी साजरी केली.


   माणूस हा समाजशील प्राणी आहे वेगवेगळे सण आणि उत्सव आपण आपल्या घरात साजरी करतो परंतु ज्यांना कोणी नाही त्यांची दिवाळी मात्र गोड जात नाही हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून मित्र मंडळाच्या वतीने आज घाटनांदुर येथील वृद्धाश्रमात वृद्ध महिला आणि पुरुषांसोबत दीपावलीचा सण अगदी आनंदात आणि उत्साहात मित्र मंडळाच्या वतीने साजरा केला.


  यावेळी गुरुदास वृद्धाश्रमाचे अध्यक्ष दासलालजी दहिवाळ, माजी सरपंच सुभाष चव्हाण, नरहरी मंठेकर ,दादाराव मंठेकर, यांच्यासह मित्र मंडळाचे गौरी शंकर मोदी, राहुल कांदे, अनिल चौधरी, शिवाजी मुंडे सर, गंगाधर गुट्टे, शिवा बडे,रमेश संकाये, पिंटू सरवदे, बालू चाटे, बंडू केंद्रे, बालू गुट्टे, परमेश्वर मुंडे, गोविंद कांदे, प्रवीण रोडे, आकाश सौंदळे, गजानन घाळे, प्रथमेश वारद, सौरभ भांगे, यश रोडे, ओमकार शिंदे आदीसह आश्रमातील सर्व वृद्ध पुरुष महिला आणि मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार