MB NEWS-उद्या परळीत संत जगमित्रनागा महाराज संजीवन समाधी सोहळा

उद्या परळीत संत जगमित्रनागा महाराज संजीवन समाधी सोहळा 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....
          संत नामदेवरायांच्या समकालीन असलेले संत जगमित्रनागा महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा दिनांक 21 रोजी असून समाधी सोहळ्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
   वारकरी संप्रदायातील अध्वर्यू संत मांदियाळीतील प्रमुख संत असलेल्या व संत नामदेव महाराज यांच्या समकालीन संत जगमित्रनागा महाराज यांची परळी येथे संजीवन समाधी आहे. संत जगमित्रनागा महाराज यांचा समाधी सोहळा शुक्रवार दिनांक 21 रोजी साजरा होणार आहे. या निमित्ताने दुपारी बारा वाजता गुलाल उधळून समाधी सोहळा साजरा केला जाईल. हभप प्रा.डॉ. शाम महाराज नेरकर यांचे पूजेचे कीर्तन होणार आहे. त्याचप्रमाणे ग्रंथ वितरण व महापूजा होणार आहे. या समाधी सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संत जगमित्र नागा देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
  दरम्यान श्री सुधाकर महाराज श्रीरंग मद्रेवार लातूरकर चापोली यांच्या तर्फे समाधी सोहळा उत्सव महापूजा होणार आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ,नामदेव गाथा या ग्रंथाचे वाटप होणार आहे. तसेच श्री ह भ प सुधाकर श्रीरंग मद्रेवार यांना संत जगमित्रनागा चरणदास उपाधीने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती वंशज पुजारी श्री. शामराव औटी यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार