MB NEWS-परळी वैजनाथ : निराधारांची दिवाळी होणार आनंदात: दोन दिवसांत अनुदान वाटप करण्याच्या तहसीलदारांच्या सक्त सुचना

 परळी वैजनाथ : निराधारांची दिवाळी होणार आनंदात: दोन दिवसांत अनुदान वाटप करण्याच्या तहसीलदारांच्या सक्त सुचना







परळी वैजनाथ...

     संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेच्या लाभार्थीना माहे. जुलै ते सप्टेंबर- 2022 चे अनुदान दोन दिवसांत वाटप करावे अशा सक्त सुचना परळीचे तहसीलदार सुरेश शेजुळ यांनी बँकांना दिल्या आहेत. त्यामुळेनिराधारांची दिवाळी होणार आनंदात होणार आहे.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी संख्या 5013 लाभार्थीना माहे. जुलै ते सप्टेंबर- 2022 चे अनुदान रुपये 3000/- तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थी संख्या 12282 लाभार्थीना माहे. जुलै ते सप्टेंबर-2022 चे अनुदान रुपये 3000/- तसेच दि. 27/12/2021 च्या बैठकीमध्ये मंजूर झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी संख्या 439 लाभार्थीना प्रत्येकी 9000/- तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दि.27/12/2021 रोजी बैठकीमध्ये मंजूर झालेल्या लाभार्थी संख्या 1023 लाभार्थीना प्रत्येकी 9000/- अनुदान बँकनिहाय वाटप करण्यात आलेले आहे.

तसेच केंद्र पुरस्कृत योजनेतील इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थी संख्या 2547 लाभार्थीना माहे. जुलै ते सप्टेंबर-2022 चे 2400/- अनुदान वाटप करण्यात आलेले आहे. तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थी संख्या 273 लाभार्थीना माहे. जुलै ते सप्टेंबर 2022 चे अनुदान रुपये 2100/- वाटप करण्यात आलेले आहे. व तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग लाभार्थी संख्या 177 यांना माहे. जुलै ते सप्टेंबर 2022 चे अनुदान रुपये 2100/- अनुदान वाटप करण्यात आलेले आहे.

केंद्र पुरस्कृत योजनेतील 2997 लाभार्थीना थकीत झालेले अनुदान अनुदान येताच त्या लाभार्थीना अनुदान काढण्यात येईल. आसे एकूण 21646 लाभार्थीना माहे. जुलै ते सप्टेंबर 2022 चे अनुदान रुपये 72537200 (आक्षरी सात कोटी पंचेवीस लाख सदोतीस हजार दोनशे रुपये फक्त. ) अनुदान बँकनिहाय वाटप करण्यात आलेले आहे.

परळी तालुक्यातील एकूण लाभार्थी संख्या: 21646

एकूण अनुदान वाटप = 72537200/

      दरम्यान, दोन दिवसात अनुदान लाभार्थी यांना वाटप करण्या बाबत सर्व बँकेला सक्त सूचना दिल्या आहेत अशी माहिती श्री सुरेश शेजूळ तहसीलदार, परळी वै. यांनी दिली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार