MB NEWS-जांब समर्थ मूर्ती चोरी प्रकरणी कर्नाटकातून दाेघांना घेतलं ताब्यात

 जांब समर्थ मूर्ती चोरी प्रकरणी  कर्नाटकातून दाेघांना घेतलं ताब्यात

      

जालना जिल्ह्यातील जांब समर्थ गावातील राम मंदिरातील मुर्ती चाेरी प्रकरणात दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कर्नाटक राज्यातून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. प्रदिर्घ काळानंतर मूर्ती चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (lcb) पथकास मोठं यश आले आहे. 

              घनसावनगी तालुक्यातील जांब समर्थ गावातील रामदास स्वामी यांच्या पूर्वजांनी पंच धातूच्या सुमारे ७५० वर्षपूर्वी स्थापन केलेल्या प्रभू श्रीरामचंद्राच्या आणि हनुमान, सीता, भरत शत्रुघ्न, आदींच्या १३ मूर्ती गेल्या दोन महिन्यांपूर्वी पासून चोरी गेल्या होत्या. या प्राचीन मूर्तीचा कुठल्याच प्रकारे ठाव ठिकाणा लागत नसल्याने भविकांकडून या मूर्ती चोरी प्रकरणाचा छडा लागावा म्हणून आंदोलन देखील करण्यात आले होते.

      पोलिसांकडून याचा तपास सुरू होता. मात्र ठोस पुरावा मिळत नसल्याने पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली होती. पोलिसांकडून राज्यभरात या प्रकरणी तपास सुरू होता. या प्राचीन पंचधातूंच्या मूर्ती चोरी प्रकरणात आंतराष्ट्रीय टोळीचा हात असण्याची शक्यता ही वर्तविली जात होती. त्यामुळे देशातील ६६ विमानतळ, पोर्ट, बंदरे या ठिकाणी असलेल्या यंत्रणेला ही दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

       खामगावातील भीषण आगीत आठ दुकाने जळून खाक; अकोला, शेगावची फायर ब्रिगेड यंत्रणा धावली मदतीला या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमकडून राज्यातील मूर्ती चोरीच्या घटनांचा ही अभ्यास करवून या गुन्ह्याचा छडा लावण्याचा प्रयन्त सुरू होता. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने कर्नाटक राज्यातून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार