MB NEWS- *परळी तालुक्यात परचुंडी व परिसरात जमिनीतुन गुढ आवाज: नागरिकांचे प्रशासनाला निवेदन*

 परळी तालुक्यात परचुंडी व परिसरात जमिनीतुन गुढ आवाज: नागरिकांचे प्रशासनाला निवेदन

परळीवैजनाथ /प्रतिनिधीः 

           परळी तालुक्यातील परचुंडी मलनाथपुर परिसराला  अचानक काही क्षण जमिनीतुन गुढ आवाज व पत्रे  हादरल्याचा अनुभव आला. त्यामुळे नागरिकांत भिती निर्माण झाली आहे.दरम्यान याबाबत महसूल प्रशासन सखोल माहिती घेत आहे.
   परचुंडी मलनाथपुर परिसराला काल दि.25 पासून  जमीन  हादरली, पत्र्याचा आवाज आला व जमिनीतुन आवाज आला असे जाणवल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले. अचानक जाणवलेल्या हादर्यामुळे  नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.  मोठा हादरा व जमिनीतुन गुढ आवाज परिसरातील लोकांना ऐकायला आला. त्यामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणावर लोक एकत्र झाले होते.नेमका हादरा कशामुळे बसला हे स्पष्ट झाले नाही.    

नागरीकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये....

     दरम्यान अशा काही घटना घडल्या की लगेचच सोशल नेटवर्किंग मिडियातून यासंदर्भात मिळेल त्या माहितीनुसार विविध प्रकारच्या पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. घटनांबद्दल गांभीर्य लक्षात घेऊन माहिती दिली गेली पाहिजे परंतु फाॅरवर्ड आणि काॅपी पेस्ट च्या जमान्यात घटनेचे गांभीर्य ओळखले जात नाही. त्यामुळे नागरिकांनी  अधिकृत व खात्री करूनच माहिती पुढे प्रसारित करावी.अफवा पसरवू नये किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार