MB NEWS-नुकसानीची पहाणी: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर थेट बांधावर

 नुकसानीची पहाणी: विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर थेट बांधावर






बीड- कापूस आणि सोयाबीनच्या पहिल्या तोडणीनंतर चार पैसे हातात येतील अन दिवाळी जोरात साजरी होईल या बळीराजाच्या आशेवर सततच्या पावसाने पाणी फेरलं अन बळीराजा कोलमडून पडला.या शेतकऱ्याला थेट बांधावर जात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आधार दिला.नुकसानभरपाई निश्चित मिळेल,काळजी करू नका अस म्हणत केंद्रेकर यांनी गेवराई, बीड,आष्टी,पाटोदा या भागातील शेतकऱ्यांना आधार दिला.


औरंगाबाद चे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आज बीड जिल्ह्यात डेरेदाखल होत गेवराईत रस्त्यावरील काही शेतातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात गेले, त्याठिकाणी शेतकरी चिखलामध्ये कापसाची वेचणी करत होते. शेतकर्‍यांनी केंद्रेकरांना पाहताच आपल्या व्यथा मांडायला सुरुवात केली. तेव्हा केंद्रेकरांनी नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे, हे सांगायची गरज नाही. आपणाला मदत मिळेल, वस्तूस्थितीनुसारचा अहवाल सरकार दरबारी पाठवला जाईल, असे उपस्थित शेतकर्‍यांना केंद्रेकरांनी आश्वासीत केले


बीड जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने हाहाकार उडून शेतातील पिके उद्ध्वस्त करून टाकले. रडकुंडीला आलेल्या शेतकर्‍यांना शासन-प्रशासन दरबारातून अद्याप कुठलीच मदत मिळाली नाही. शेतकर्‍यात शासन-प्रशासनाविरुद्ध संताप असतानाच आज आयुक्त सुनील केंद्रेकर हे शेतातील पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जिल्ह्यात डेरेदाखल झाले.

औरंगाबादहून येताना त्यांनी गेवराईत पाहणी केली. रस्त्यावरून जाताना अचानक एका ठिकाणी गाडी थांबविली आणि थेट ते कापसाच्या पिकात डेरेदाखल झाले.त्यानंतर केंद्रेकर यांनी बीड, आष्टी आणि पाटोदा या तालुक्यातील अनेक गावांना भेटी देत पाहणी केली.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

Video: अमानुष मारहाण....धक्कादायक प्रकार!

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार