MB NEWS-नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मिलन

 नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या माजी विद्यार्थी स्नेह मिलन व गुरुवर्य वीरेंद्र नरवणे  यांचा ऋणनिर्देश समारंभ

 परळी वैजनाथ- नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन आणि गुरुवर्य श्री वीरेंद्रजी नरवणे सर यांचा ऋणनिर्देश सोहळा दिनांक 27 ऑक्टोबर 2022 रोजी बाबा रामदेव मंदिर परळी वैजनाथ येथे उत्साहात पार पडला.

        हा कार्यक्रम दोन सत्रात आयोजित करण्यात आला त्यामध्ये सकाळच्या सत्रात गुरुवर्य श्री वीरेंद्रजी नरवणे सर यांच्या सत्कार प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जुन्या पिढीतील पेंटर राम मस्के, चंदुलाल बियाणी, एस एल  देशमुख सर आणि डॉ. सुरेश चौधरी उपस्थित होते.

 कार्यक्रमाच्या सुरुवातीला  जय शारदे वागेश्वरी हे गीत सुलेखा मस्के यांनी सादर केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत सोनटक्के यांनी केले.

 पाहुण्यांच्या हस्ते गुरुवर्य  वीरेंद्र नरवणे व सौ.आरती वीरेंद्र नरवणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.

  सत्काराला उत्तर देत असताना वीरेंद्र नरवणे सरांनी सर्वांचे आभार मानले  व अनपेक्षित असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर अक्षरशः भारावून गेले.

 दुपारी भोजनानंतर दुसऱ्या सत्रात संगीत मैफिलीने सुरुवात झाली. यामध्ये मुंबई पुणे नांदेड उदगीर परभणी येथून आलेल्या माजी कलावंत विद्यार्थ्यांनी बहारदार संगीताची मेजवानी दिली.

 या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री महेश मळगे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक प्रसाद देशमुख यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वैजनाथ शेंगोळे सर. दीपक आंधळे सर, श्रीकांत सोनटक्के सर, सुरेश पोरवाल, सचिन घटे, जितेंद्र नव्हाडे, प्रा. रविशंकर स्वामी सर, संभाजी देशमुख, प्रा. प्रसाद देशमुख , देवेंद्र मस्के, पवार, व इतर आजी व माजी विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

  1. स्नेह मेळावा हा गुरु आणि शिष्यांचा स्नेह वृद्धिंगत करणारा खूप छान उत्सव ठरला.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार