मुख्य सामग्रीवर वगळा

MB NEWS-सौदागर कांदे यांना महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

 सौदागर कांदे यांना महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार



परळी प्रतिनिधी.    तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दगडवाडी येथील आदर्श शिक्षक सौदागर आबाजीराव कांदे यांना महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने दिला जाणारा महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2022 जाहीर झाला असून 30 ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत जयसिंगपूर येथे एका भव्य कार्यक्रमात पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे.
      नुकताच यावर्षीचा बीड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, तसेच शिक्षण महर्षी राज्यस्तरीय पुरस्कार सौदागर कांदे यांना मिळाला होता. आता त्यांची महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषदेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे. याबाबतचे निवड पत्र नुकतेच सौदागर कांदे यांना प्राप्त झाले आहे.
      30 ऑक्टोबर 2022 रविवार रोजी सहकार महर्षी शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृह, जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर येथे महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने बारावी राज्यस्तरीय शिक्षण परिषद व पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या शिक्षण परिषदेचे उद्घाटन माजी खासदार तथा स्वराज संघटनेचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रमाता अहिल्याबाई होळकर यांचे वंशज इंदोर येथील श्रीमंत भूषण सिंहजी राजे या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी आहेत. तर खासदार धैर्यशील माने यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील, अडवोकेट गजानन कदम, माधवराव रावणगावकर, आयुर्वेद रत्न राजाराम टिळे पाटील, तसेच आयोजक व्यंकटराव जाधव प्रदेशाध्यक्ष महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
    उद्घाटन सोहळ्यानंतर राष्ट्रीय नागरी रत्न पुरस्कार तसेच महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचे मान्यवरांच्या हस्ते वितरण होणार आहे. सौदागर कांदे यांचे शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक कार्य याची दखल घेऊन तसेच त्यांना यापूर्वी मिळालेले बीड जिल्हा परिषदेचा तसेच राज्यस्तरीय पुरस्काराची दखल घेतल्यानंतर त्यांची या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाल्याचे प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव यांनी पाठविलेल्या अभिनंदन पत्रात म्हटले आहे.
     सौदागर कांदे यांना जाहीर झालेल्या महात्मा ज्योतिराव फुले राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारामुळे सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !