MB NEWS-कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृतिदिनाचे औचित्य

 मांडेखेल येथे पंजाबराव डख यांचे व्याख्यान



कॉ.गंगाधरअप्पा बुरांडे स्मृतिदिनाचे औचित्य


परळी / प्रतिनिधी


झुंजार स्वातंत्र्य सेनानी,बीड जिल्ह्याचे माजी खासदार, महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संस्थापक कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे यांच्या १४ व्या स्मृती दिनानिमित्त मांडेखेल येथे शुक्रवार (दि.७) रोजी हवामानाचे अचुक अंदाज वर्तविणारे हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे व्याख्यान होणार आहे.


परळी तालुक्यातील मांडेखेल येथील आसुबाई माध्य व उच्च विद्यालयात कॉ. गंगाधरअप्पा बुरांडे स्मृती दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा व पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास अचुक हमानाचा अंदाज वर्तविणारे पंजाबराव डख, प्राचार्य सुनंदा तीडके व महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे सचिव अँड.अजय बुरांडे यांची प्रमुख उपस्थीती असणार आहे. कॉ गंगाधरअप्पा बुरांडे यांनी चाळीस वर्षापुर्वी मांडेखेल व परिसरातील विद्यार्थांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणुन महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित आसुबाई विद्यालयाची स्थापना केली. या शाळेतुन दरवर्षी अनेक गुणवंत विद्यार्थी बाहेर पडत असतात. त्यामुळे त्यांचा सन्मान व शाळेतील उपक्रमशिल शिक्षणाची पालकांना माहीती व्हावी यासाठी शुक्रवारी (ता.७) सकाळी 11 वाजता होणाऱ्या कार्यक्रमास शाळेचे गुणवंत विद्यार्थी, सर्व पालक व परिसरातील शेतकऱ्यांनी मोठया संख्येनी उपस्थीत रहावे असे आवाहन आसुबाई विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार