MB NEWS-निसर्गाने हिरावले माधव जाधव यांनी सावरले

 निसर्गाने हिरावले माधव जाधव यांनी सावरले 



बुरांडे कुटुंबाला आर्थिक मदतीचा दिला आधार 


घाटनांदूर (प्रतिनिधी) :  अंबाजोगाई तालुक्यातील व परळी विधानसभा मतदार संघातील घाटनांदूर परिसरात गुरुवारी रात्री झालेल्या विध्वंसक पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. घाटनांदूर परिसरातील हजारो हेक्टर वरील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. 

     घाटनांदूर पासून नजीकच्या पूस गावातील रहिवासी अशोक बुरांडे यांचे गुरुवारी रात्री झालेल्या  भयंकर पावसाने घर पडून अत्यंत नुकसान झाले. ऐन दिवाळीच्या तोंडावर नैसर्गिक आपत्तीमुळे घर पडल्यामुळे सामान्य कुटुंबाचा संसार उघड्यावर पडला आहे. बुरांडे कुटूंब अशा संकटात असताना मराठवाडा किसान काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य ॲड.माधव जाधव यांनी पूस येथील बुरांडे कुटूंबियांची भेट घेतली. तसेच बुरांडे कुटुंबाच्या दुःखात सामील होऊन त्यांना प्राथमिक स्वरूपात दहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली. संकट समयी अशोक बुरांडे यांच्या कुटुंबाला तात्काळ मदत केल्यामुळे पूस येथील गावकऱ्यांनी निसर्गाने हिरावले;  पण ॲड.माधव जाधव यांनी सावरले ! अशा शब्दात माधव जाधव यांच्या सामाजिक जाणिव समोर ठेऊन केलेल्या कार्याचे कौतुक केले. 

     यावेळी ॲड.माधव जाधव यांच्या सह प्रा. श्रीकांत खुणे, श्रीराम पवार, किरण पवार, बस्वराज स्वामी, ॲड.गौरशेटे, शुभम घोलप, शरद पवार, शेखर गौरशेटे, शशी गौरशेटे, विशाल पवार आदि युवा कार्यकर्ते आणि जेष्ठ नागरिक उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार