MB NEWS- प्रा.टी.पी.मुंडे बांधावर : तलाठी सोबत घेऊन सरसकट पंचनामा करण्याच्या केल्या सूचना

 प्रा.टी.पी.मुंडे बांधावर : तलाठी  सोबत घेऊन सरसकट पंचनामा करण्याच्या केल्या सूचना



परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

परळी तालुक्यातील मोजे संगम येथे रात्री विजेच्या कडकडाटासह अतिशय जोरदार पावसाचा कहर झाला. प्रा.टी.पी.मुंडे (सर )यांनी संगम येथे पुलाची, घरांची तसेच शेतातील पिकांची बांधावर जाऊन पाहणी केली. संगम वस्ती व गावाला जोडणाऱ्या पुलावरून अतिशय वेगाने पाणी वाहत असल्यामुळे गावचा संपर्क तुटला असून गावातील घरात पाणी शिरले आहे त्यामुळे घरात ठेवलेले सोयाबीन, कापूस, तूर इत्यादी पिके भिजवून गेली आहेत. पुन्हा एकदा संकटात सापडलेल्या शेतकऱ्यासाठी आणि नागरिकांसाठी  प्रा.टी.पी.मुंडे (सर) ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले. 


  संगम वागबेट येथील तलाठी श्रीमती गोरे मॅडम यांना सोबत घेऊन त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला तसेच पुलाची घरात भिजलेले पिके आणि शेतात जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली तसेच सरसकट पंचनामा करण्याच्या सूचना तलाठी यांना दिल्या. प्रत्येक घरात जाऊन त्यांनी तेथील नागरिकांशी तसेच महिलांशी संवाद साधून त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांना धीर दिला.

  रात्री झालेल्या परतीच्या पावसामुळे येथील पिकांचे घरांचे अतोनात नुकसान झाले आहे पावसाचा जोर एवढा होता की जनावरे सुद्धा बेपत्ता झाली आहेत तसेच काही गुरे पाण्यात वाहून गेली आहेत. घरामध्ये जवळपास 5 ते 6 फूट पावसाचे पाणी घुसल्याने घरामध्ये ठेवलेले सोयाबीन आणि कापूस भिजून नष्ट झाला आहे.


   संगम रोडवरील वस्ती येथे यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे परळी-सोनपेठ इंजेगाव मार्गे या रस्त्याचे काम चालू आहे. संगम येथे रोडच्या बाजूने नाल्या काढल्या नसल्यामुळे पावसाचे पाणी संपूर्ण घरामध्ये गेले असून घरात असलेले सोयाबीन आणि कापूस तूर हे पिके भिजवून गेल्यामुळे त्याचा वास येत आहे आणि ते बाजारामध्ये विकण्यासही येत नाही. यश कन्स्ट्रक्शन कंपनीचे अधिकारी यांना फोन द्वारे बोलून त्यांनी रोडच्या बाजूने तात्पुरत्या स्वरूपात नाल्या करण्याच्या त्यांनी सूचना दिल्या. यावेळी विनायक गडदे, संतराम गडदे, संगमचे सरपंच हरिष नागरगोजे, युवा कार्यकर्ते पिंटू नागरगोजे,सरदारजी, दीपक नागरगोजे, आदीसह गावातील युवक जेष्ठ नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

● संबंधित व्हिडिओ बातमी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा......


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !