MB NEWS-मुख्यमंत्र्यांचे लोकाभिमुख कार्य महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर पोंहचवेल- शिंदे,गित्ते

 मुख्यमंत्र्यांचे लोकाभिमुख कार्य महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर पोंहचवेल- शिंदे,गित्ते


परळी (प्रतिनीधी)

 महाराष्ट्रात हिंदुत्वाबरोबरच सर्वसामान्य जनतेची कामे जलदगतीने होत असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या या लोकाभिमुख कार्यामुळे महाराष्ट्र लवकरच प्रगतीच्या शिखरावर पोंहचलेला असेल.मुख्यमंत्र्यांचे हे कार्य अनेकांच्या डोळ्यात सलत असले तरी मुख्यमंत्र्यांचे हे कार्य जनतेपर्यंत पोंहचवणार असल्याचे शिवसेना (शिंदेगट) चे तालुकाप्रमुख  शिवाजी शिंदे व जेष्ठ नेते धनंजय गित्ते यांनी सांगितले.

 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणुन एकनाथ शिंदे साहेबांनी शपथ घेतल्यानंतर अडीच वर्षात आघाडीतील बिघाडीमुळे रखडलेला विकास सुरु झाला.महाराष्ट्राला 24 तास काम करणारा मुख्यमंत्री मिळाल्याने सर्वसामान्यांची कामे जलदगतीने होवु लागली आहेत.अपघातग्रस्तांना मदत असो अथवा अडचणीत सापडलेला रिक्षाचालक अशा सर्वांशी थेट संपर्क साधुन धिर देणारा मुख्यमंत्री मिळाला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे हेच कार्य विरोधकांना अडचणीचे वाटत असल्याने त्यांना पोकळ धमक्या देत आहेत.आम्ही एकनाथ शिंदे साहेबांचे कट्टर सैनिक असुन अशा पोकळ धमक्या इशार्यांना घाबरत नाहीत.मुख्यमंत्र्यांचे हे लोकाभिमुख कार्य जनतेपर्यंत पोंहचवुन आरोप करणार्या विरोधकांचे हात त्यांच्याच घशात घालु असा इशारा शिवसेना (शिंदेगट) चे तालुकाप्रमुख शिवाजी शिंदे,जेष्ठनेते धनंजय गित्ते यांनी दिला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार