MB NEWS-शेतकऱ्यांबाबत प्रशासनाची गंभीर अनास्था: किसान सभेने आंदोलनाचे निवेदन देऊनही कार्यालयीन दिनी कृषी कार्यालय दुपारपर्यंत कुलूप बंद

शेतकऱ्यांबाबत प्रशासनाची गंभीर अनास्था: किसान सभेने आंदोलनाचे  निवेदन देऊनही कार्यालयीन दिनी कृषी कार्यालय दुपारपर्यंत कुलूप बंद



परळी / प्रतिनिधी


दिवाळी सणात शेतकऱ्यांचे विमा अग्रीम व अतिवृष्टी मदतीसाठी शिमगा आंदोलन अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने परळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयासमोर करण्यात आले. सुट्टी नसताना देखील तालुका कृषी कार्यालय चक्क 1 वाजता आंदोलनकर्त्यांच्या धसक्याने उघडण्यात आले.या ठिकाणी एक ही कर्मचारी उपस्थित नसल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले. परिस्थितीचे गांभीर्य पाहता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमाकांत कस्तुरे व त्यांचे कर्मचारी कृषी कार्यालय परिसरात डेरेदाखल झाले.


संपूर्ण जिल्ह्यातच झालेली अतिवृष्टी जून-जुलै मधील सततचा पाऊस त्यानंतरचा पावसातील मोठा खंड आणि वेगवेगळ्या रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव या तावडीतून जे काही वाचलेले निम्मेशिम्मे पीक तेही ऑक्टोबर मधील अतिवृष्टीने पुरते हातून गेले आहे.अशा अवस्थेत अगोदर घोषित केलेले पंचवीस टक्के पीकविमा अग्रीम तेही शेतक-यांच्या पदरात अजूनही पडलेले नाही.या अतिवृष्टीने प्रचंड शेतकऱ्यांचे नुकसान केलेले असून त्याची दखल शासन आणि प्रशासनाने घेतली नाही. शेतकऱ्यांना लवकरात लवकर विमा अग्रिम मिळावे व अतिवृष्टी मदत मिळावी या मागण्यांना घेऊन मंगळवार दि २५ रोजी दिवाळी सणात परळी तालुका कृषी कार्यालयासमोर शिमगा आंदोलन किसान सभेकडून करण्यात आले.या आंदोलनाचे निवेदन कल्पना देऊन ही तालुक्यातील कृषी कार्यालय चक्क दुपारी 1 वाजेपर्यंत कुलूप बंद असल्याने आंदोलनकर्ते संतप्त झाले आहेत.कृषी अधिकारी,पीक विमा कंपनी व ईडी सरकार विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत आपला आक्रोश व्यक्त केला.दरम्यान  आंदोलन कर्त्यांच्या धास्तीने धावत-पळत आलेल्या कृषी अधिकारी यांनी दि 28 तारखेपर्यंत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनास अहवाल सादर करू असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्याना दिल्यानंतर हे शेतकऱ्यांचे शिमगा आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ.अजय बुरांडे, जिल्हाक्षक कॉ. मुरलीधर नागरगोजे,कॉ. पांडुरंग राठोड, कॉ. भगवान बड़े,कॉ. कांबळे आबा कॉ. विष्णू देशमुख,कॉ. रूस्तुम माने,कॉ. मुक्तेश्वर कडभाने,कॉ. राजेभाऊ गडदे,कॉ. बालासाहेब पौळ,कॉ. धनंजय सोळके,कॉ. माऊली मुठाळ,कॉ. अशोक नागरगोजे,कॉ. अंकुश उबाळे,कॉ. रमेश देवकते,कॉ. सखाराम देवळे यांच्यासह अनेक शेतकरी, शेतकरी पुत्र उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार