MB NEWS-सर्व सामान्य जनतेची गाऱ्हाणी ऐकली ; समस्यांचा केला जागेवरच निपटारा*

 पंकजाताई मुंडेंचा बीड शहरात जनता दरबार :समस्यांचा केला  जागेवरच निपटारा


सर्व सामान्य जनतेची गाऱ्हाणी  ऐकली ; समस्यांचा केला  जागेवरच निपटारा


बीड  ।दिनांक १९।

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी आज शहरात घेतलेल्या जनता दरबारात शहर व विविध तालुक्यातील नागरिकांनी आपली गाऱ्हाणी  मांडण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रत्येकांच्या समस्या ऐकून घेत पंकजाताईंनी त्यांच्या समस्यांचा जागेवरच निपटारा केला.


    पंकजाताई मुंडे आज बीड दौऱ्यावर आल्या होत्या. सकाळी त्यांनी भाजपचे दिवंगत शहराध्यक्ष भगीरथ बियाणी यांच्या परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या संपर्क कार्यालयात त्यांनी जनता दरबार घेतला. बीडसह आष्टी, पाटोदा, शिरूर, गेवराई आदी तालुक्यातील नागरिक आपल्या विविध वैयक्तिक व सार्वजनिक   समस्या घेऊन आले होते. या सर्वांची गाऱ्हाणी ऐकून घेत पंकजाताईंनी त्यांच्या समस्यांचा निपटारा जागेवरच केला. काही संघटनांनी आपल्या शिष्टमंडळासह त्यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. पंकजाताईंनी घेतलेल्या या जनता दरबारात तातडीने समस्या मार्गी लागल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

••••

● हे देखील पहा:

🏵️ *जेंव्हा प्रवासात पंकजा मुंडे स्वतःच चहा बनवत कार्यकर्त्यांसमवेत घेतात आस्वाद.* *#mbnews#subscribe #like #share# comments*


🔴 *पंकजा मुंडेंचे नाव घेत सुषमा अंधारेंचा भाजपवर हल्लाबोल.* *#mbnews#subscribe #like #share #comments*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार