MB NEWS-परळीच्या महाराष्ट्र बँकेला लागली आग ; सखोल तपासणी

 परळीच्या महाराष्ट्र बँकेला लागली आग ; सखोल तपासणी 

 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

       येथील मोंढा विभागातील महाराष्ट्र बँकेच्या शाखेला आग लागून धुराचे लोट दिसून येत होते. आज सकाळच्या सुमारास महाराष्ट्र बँकेच्या इमारतीतून धुराचे लोट नागरिकांना दिसून आले त्यामुळे बँक आगीच्या भक्षस्थानी सापडले आहे असे लक्षात आले. नागरिकांनी तात्काळ हि बाब परळीचे अग्निशमन दल व पोलिसांना कळवली दरम्यान आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून बँकेत काय काय जळाले आहे याची सखोल तपासणी सध्या सुरू आहे

      परळी येथील स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र आर्य समाज मंदिर जवळ असलेल्या शाखेत शनिवार दि 22 रोजी सकाळी अचानक अचानक भीषण आग लागली.

        आगीचे लोट दिसताच स्थानिक नागतिकांनी परळी परळी नगर परिषदेच्या अग्निशमन दलास याची कल्पना दिली असता अग्निशमन दलाने आग आटोकात आणायचे प्रयत्न सुरू केले. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली असून सदरील ठिकाण संभाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असून 1 अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
       प्रथमदर्शी ही आग शाॅर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात असून या आगीत बँकेचे सर्व रेकॉर्ड जळून खाक झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.परळी नगर परिषदेचे 2 अग्नी बंब, वैद्यनाथ सह साखर कारखाना यांचा 1 व परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्र यांचा 1 असे 4 बंब व कर्मचारी आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !