इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-विश्व हिंदू परिषदेच्या वतीने परळी वैद्यनाथ येथे वसुबारस/गोवत्स द्वादशी उत्साहात साजरी

 विश्व हिंदू परिषदेच्या वतीने परळी वैद्यनाथ येथे वसुबारस/गोवत्स द्वादशी उत्साहात साजरी 



परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

विश्व हिंदू परिषद, परळी-वैद्यनाथ तर्फे आज दि. २१/१०/२०२२ *वसुबारस अथवा गोवत्स द्वादशीचा* कार्यक्रम विविध ठिकाणी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला.


विश्व हिंदू परिषद, परळी-वैद्यनाथ सत्संग प्रमुख श्री रविंद्रजी वेताळ व मातृशक्ती प्रखंड संयोजिका सौ. अपर्णाताई वेताळ यांनी गोमातेला व वासरास साडी चोळीचा आहेर अर्पण केला.


वसुबारस कार्यक्रमाचे धार्मिक महत्त्व विश्व हिंदू परिषद सत्संग प्रमुख ह. भ. प. श्री रविंद्रजी वेताळ यांनी विषद केले तर वैद्यानिक महत्त्व प्रसिद्ध फोटोग्राफर व गोप्रेमी श्री सुनीलजी फुलारी यांनी विस्तृतपणे सांगितले.


जास्तीत जास्त प्रमाणात गोउत्पाद (दुध, दही, तुप, धूप, गोवरी, सेंद्रिय शेतीतील उत्पादन) वापरून सर्वसामान्य जनतेने गोसेवा व गोसंवर्धनात सहभागी व्हावे असे आवाहन विश्व हिंदू परिषद परळी-वैद्यनाथ शहर मंत्री श्री वैभवजी धोंड यांनी केले.


प्रसिद्ध गोपालक श्री. सचिनजी येवतेकर यांनी गोसेवेचे अनुभव व गोमुत्र अर्काचा मानवी आरोग्यावर होणारा चांगला परिणाम पत्रक वितरीत करून सांगितला.


वैद्यनाथ देवल कमेटिचे विश्वस्त व गोपालक श्री प्रदीपराव देशमुख यांनी अनेक पिढ्यांपासून त्यांच्या घरात असलेले गायीसोबतचे भावनिक नाते उलगडून सांगितले.


ह्या कार्यक्रमामध्ये गोपूजना सोबतच गोपालकांचा ( श्री नवनाथजी सोळंके, श्री. प्रदीपराव देशमुख, श्री. ओपळेजी, श्री रामरक्षा गोशाळेचे श्री रतनसेठ कोठारी, वृंदावनी डेअरीचे श्री सचिनजी येवतेकर व विश्व हिंदू परिषद प्रखंड मंत्री श्री शैलेशजी पांडे, श्री बाळकृष्णजी फुले) हार, श्रीफळ देऊन यथोचित सत्कार विश्व हिंदू परिषद, परळी-वैद्यनाथ तर्फे करण्यात आला.


ह्या प्रसंगी श्री रतनसेठ कोठारीजी, गोप्रेमी व समाजसेवक श्री हरिप्रसादजी मोदानी व श्री नंदसेठजी खानापुरे यांनी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.


वसुबारस कार्यक्रम परळी वैद्यनाथ मध्ये विविध ठिकाणी साजरा करण्यासाठी विश्व हिंदू परिषद, परळी-वैद्यनाथ च्या सर्व पदाधिकारी वर्गाने चोख नियोजन केले होते व पुढील वर्षी वसुबारसचा कार्यक्रम अजून भव्य, दिव्य प्रमाणात साजरा करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!