MB NEWS-■ नुकसान भरपाई व विमाप्रश्नी किसान सभेचे जिल्हाधिकारी कचेरीवर जोरदार निदर्शने

 ■ नुकसान भरपाई व विमाप्रश्नी किसान सभेचे जिल्हाधिकारी कचेरीवर जोरदार निदर्शने



◆ दिवाळी पूर्वी शासन व प्रशासनास दिला इशारा


बीड/परळी : प्रतिनिधी


सैंपल सर्वे'द्वारे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांना पिकविमा मंजूर करून तो वितरित करावा व अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना शासनस्तरावरुन मदत देण्यात यावी या मागणीला घेऊन पुन्हा एकदा किसान सभेचे लाल वादळ दिवाळी सणापूर्वी जिल्हाधिकारी कचेरीवर धडकले.या निदर्शने आंदोलनात जिल्ह्याभरातुन मोठ्या संख्येने शेतकरी,शेतकरी पुत्र,तरुण सहभागी झाले होते.यावेळी संतप्त शेतकरी पुत्रांनी भ्रष्ट पीक विमा कंपनी व कंपनी धार्जिनी सरकारचा प्रतिकात्म पुतळ्याचे दहन केले.

गतवर्षी विमा प्रश्नी किसान सभेने शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिवाळी साजरी केली होती आजच्या या निदर्शने आंदोलनाने गतवर्षीचा प्रश्न आणखी सुटला नसल्याने हे आंदोलन तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


जून,जुलै मधील अतिवृष्टी, ऑगस्ट मधील 21 दिवसापेक्षा अधिक काळ पावसाचा खंड आणि 11 ऑक्टोबर पासून बीड जिल्ह्यातील विविध महसूल मंडळात परतीच्या पावसाची अतिवृष्टी होत आहे. आकाशातील वीज पडून झालेले बळी,पूर परिस्थितीत पडलेले बळी आदी जीवीत हानी मोठ्या प्रमाणावर होत असतानाच काढणीस आलेले, काढून ठेवलेले पीक हातचे गेले म्हणून वैफल्यग्रस्त होऊन शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू होते की काय अशी पुन्हा भयावह परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. सोयाबीन, बाजरी, इत्यादी पिकांचे , वेचणीस आलेल्या कापसाचे,पाणी साचून राहिल्याने तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आणखीही पाऊस पडणे सुरुच आहे. पिकविमाधारक शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी 72 तासाच्या आत दाखल केलेल्या आहेत. नुकसानीचे प्रमाण व तक्रारीची व्यापकता पहाता पिक पंचनाम्यांच्या फेऱ्यांत वेळकाढू धोरण न अवलंबता 'सँपल सर्वे' च्या आधारे तातडीने अडचणीतल्या शेतकऱ्यांना पीकविमा मंजूर करून तो वाटप करावा व राज्य आपत्ती व्यवस्थापन कोषातूनही शासनाने जिल्ह्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे मदत द्यावी. महावेध पोर्टलवरील पावसाच्या आकडेवारीत तफावत दिसून येत असली तरी प्रत्यक्षात खुप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. कुठेकुठे तर ढगफुटी सदृश्य पाऊस पडला असून अडचणीतल्या शेतकऱ्यांना तात्काळ पीकविमा व अतिवृष्टी मदतीचे वाटप करावे. मंजुर अँग्रीम वाटप करा.सदोष पर्जन्यमापक यंत्रणा दुरुस्त करावी किमान सज्जानिहाय पर्जन्यमापक यंत्रणा कार्यान्वित करावी या प्रमुख मागण्या घेऊन मंगळवार दि 18 रोजी अखिल भारतीय किसान सभेने जिल्हाधिकारी कचेरीवर जोरदार घोषणाबाजी करून लक्षवेधी निदर्शने केली.यावेळी निदर्शनात सहभागी संतप्त शेतकरी,शेतकरी पुत्रांनी पीक विमा कंपनी विरुद्ध असलेल्या संताप प्रतिकात्म विमा कंपनी व विमा कंपनी धार्जिनी सरकारचा पुतळा दहन करून व्यक्य केला.

यावेळी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष कॉ.एड.अजय बुरांडे, कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ.काशीराम सिरसाट,कॉ.जगदीश फरताडे शेतकरी संघटनेच्या पूजा मोरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना संबोधित केले.

यावेळी किसान सभेचे कॉ.गंगाधर पोटभरे,कॉ.भगवान बडे,कॉ.विष्णू देशमुख,कॉ.कृष्णा सोळंके,कॉ.दादासाहेब सिरसाट,कॉ.एड.अशोक डाके, डॉ.सावळाराम उबाळे,कॉ.बाळासाहेब कडभाने आदींसह असंख्य पदाधिकारी, शेतकरी,शेतकरी पुत्र मोठ्या संख्येने उपस्थित होते.

●गत वर्षी किसान सभेने या मागणीला घेत सिरसाळा ते बीड 80 किमी चालत येत दिवाळी सरकारच्या दारात साजरी केली होती.


● लाल झेंडे व घोषणाबाजीने जिल्हाधिकारी कचेरी परिसर दणाणून गेला.


● विमा कंपनीच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन


● जिल्ह्याभरातुन शेकडो शेतकरी निदर्शनात सहभागी

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार