MB NEWS- ■ राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान चे प्रकल्प उपसंचालक श्याम पटवारी यांची टोकवाडी येथे भेट

 ■ राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान चे प्रकल्प उपसंचालक श्याम पटवारी यांची टोकवाडी येथे भेट

गावाच्या विकासात टोकवाडीने आदर्श निर्माण केला आहे- श्याम पटवारी 


परळी वैजनाथ, प्रतिनिधी...

         राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान चे राज्य प्रकल्प संचालक श्याम पटवारी यांनी परळी तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या टोकवाडी येथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. या पाहणीनंतर समाधान व्यक्त करत त्यांनी गावाच्या विकासात टोकवाडीने आदर्श निर्माण केला असल्याचे गौरव उद्गार काढले.

         राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान महाराष्ट्र राज्याचे प्रकल्प उपसंचालक श्री. श्याम पटवारी यांनी टोकवाडी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी गावातील स्वच्छता अभियान, घनदाट जंगल, आरो वाॅटर प्रकल्प, मोफत पिठाची गिरणी, सुंदर व बोलकी शाळा सार्वजनिक स्मशानभूमी, बायोगॅस युनिट, हॅन्ड वॉश सेंटर, ग्रामपंचायत कार्यालय आदी ठिकाणी भेटी देऊन झालेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक केले. श्री शाम पटवारी यांचा ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने ह्रदय सत्कार करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकपर मनोगत व्यक्त करताना श्री. वरद गणेश मंडळाचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य डॉ. राजाराम मुंडे यांनी ग्रामपंचायत मार्फत टोकवाडी येथे सुरू असलेल्या विविध विकास कामांची व उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यावेळी बोलताना राज्य प्रकल्प उपसंचालक श्याम पटवारी यांनी टोकवाडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून होत असलेल्या कामाचे कौतुक केले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात टोकवाडीच्या शाळेला आलेले हे रूप एखाद्या उत्कृष्ट खाजगी संस्थेच्या शाळेप्रमाणे असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर गावातील आर ओ वॉटर, वनराई, स्वच्छ व सुंदर गावाची संकल्पना राबविण्याचे प्रयत्न आदी सर्वच कामे उत्कृष्ट असून इतर गावांनाही या कामांचा आदर्श वाटावा असे कार्य असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.

        या कार्यक्रमास पंचायत समिती माजी सभापती बालाजी (पिंटू) मुंडे, टोकवाडीच्या सरपंच सौ. गोदावरीताई राजाराम मुंडे, उपसरपंच उषाताई रोडे, अश्रुबा काळे, भानूबापू मुंडे, ग्रामसेविका सुनीता रांजणकर, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर्स, स्वच्छता कर्मचारी, अंगणवाडी शिक्षिका, ग्रामपंचायत कर्मचारी आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाम आघाव सर यांनी केले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !