MB NEWS-महर्षी दयानंद व्यायाम शाळा आयोजित महिला आत्मरक्षा संरक्षण शिबिर व बाल संस्कार वर्गाचे उद्घाटन

 महर्षी दयानंद व्यायाम शाळा आयोजित महिला आत्मरक्षा संरक्षण शिबिर व बाल संस्कार वर्गाचे  उद्घाटन






परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        दरवर्षीप्रमाणे याही वर्षी18 ऑक्टोंबर 2022 ते 3 नोवेंबर 2022 या कालावधीमध्ये, 8 वर्षे ते 21वर्षे वयोगटातील मुला मुलींचे आत्मरक्षा व्यायाम शिबिर तथा संस्कार वर्ग सुरू करण्यात आले.
        या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर  जुगलकिशोर लोहिया,. देविदासराव कावरे सर , प्रशांत कुमार  शास्त्री , जयपाल लाहोटी , सुभाष नाणेकर सर, गोवर्धन चाटे सर , शिवशंकर कराड सर ,  अतुल दुबे आदी मान्यवर उपस्थित उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी जुगलकिशोर लोहिया यांनी आपल्या भाषणांमधून मुलांना आरोग्याचे धडे दिले व आत्मरक्षा शिबिराचे महत्त्व विशद केले तसेच बुद्धीच्या विकासाप्रमाणेच शारीरिक दृष्टिकोनातून आपले शरीर कशा पद्धतीने मजबूत करता येईल केले जाईल हे या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थी विद्यार्थिनींना व आलेल्या पालकांना देखील पटवून दिले.आत्मरक्षा स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर हे श्री डॉ.जगदीश कावरे सर यांच्या नियोजनबद्ध पार पडत आहे. त्याप्रसंगी महिला तसेच मुली यांच्या साठी विशेष तज्ञ प्रशिक्षक म्हणून  सौ. गोदावरीताई कावरे (मॅडम) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
      या  व्यायाम शिबिरामध्ये मुलींचा प्रवेश संख्या वाढावी यामुळे स्वतंत्र महिला प्रशिक्षक नियुक्त करण्यात आलेले आहेत तरी सर्व महिलांनी मुलींनी या व्यायाम शिबिरामध्ये सहभाग नोंदवावा अशी प्रतिक्रिया महिला प्रशिक्षक सौ.गोदावरीताई कावरे यांनी यावेळी आपले मत मांडले या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मधून व्यायाम शिबिराची तसेच दयानंद व्यायाम शाळेची बद्दल माहिती श्री.डॉ.जगदीश कावरे सर यांनी सांगितले व विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांनी या व्यायाम शिबिरामध्ये का व कशासाठी यावे याचे महत्त्व सांगत व्यायाम शाळेच्या स्थापनेपासूनचा इतिहास थोडक्यात सर्वांसमोर मांडला. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.श्रीकांत मुलगीर सर, यांनी केले. व आभार प्रदर्शन प्रा.उमाकांत कुर्रे सरांनी केले. या कार्यक्रमास महिला, पुरुष तसेच मुल, मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आलेल्या शिबिरार्थीं विद्यार्थी विद्यार्थिनींना आर्य समाज परळीच्या वतीने पौष्टिक आहार वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी महर्षी दयानंद व्यायामशाळे चे विद्यार्थी राहुल तिडके, अजय राऊत, विक्रम स्वामी ,तेजस देशमुख, तेजस जाधव ,तेजस केंद्रे, कृष्णा लोखंडे, आलियान, आली, अरिहंत गायकवाड तसेच आर्य समाज परळी चे सेवक व इतरांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !