MB NEWS-युवक महोत्सवात वैद्यनाथ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मिमिक्री कलाप्रकारात दुसरा क्रमांक

 युवक महोत्सवात वैद्यनाथ कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा मिमिक्री कलाप्रकारात दुसरा क्रमांक     


   

   परळी प्रतिनिधी--- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नुकत्याच पार पडलेल्या युवक महोत्सवांमध्ये मिमिक्री या नाट्यप्रकारांमध्ये दुसरा क्रमांक मिळाल्याबद्दल सहभागी विद्यार्थ्यांची प्राचार्य डॉ. डी व्ही मेश्राम यांनी अभिनंदन केले. श्रावण आधोडे यांने मिमिक्री हा कलाप्रकार  विद्यापीठात सादर केला त्याच्या कलाकृतीला दुसरा क्रमांक प्राप्त झाला आहे. सौरभ कुलथे यांनी पोवाडा सादर केला तसेच अपर्णा ओपळे हिने शास्त्रीय गायन, समूह गायन ,नृत्य सादर केले. शिवकन्या जिर्गे हिने लावणी नृत्य ,प्रश्नमंजुषा वादविवाद या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. मनोज मुंडे यांनी वकृत्व, प्रश्नमंजुषा, काव्यवाचन  मध्ये सहभाग घेऊन प्रेक्षकांची मने जिंकली. या युवक महोत्सवामध्ये सह कलाकार म्हणून अभिषेक कंटक, योगेश रायबोळे, रविकांत साबळे यांनी भूमिका सादर केली. या कार्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी व्ही मेश्राम यांनी संघप्रमुख डॉ वीर श्री आर्या , डॉ.सोमनाथ किरवले, सांस्कृतिक मंडळाचे सदस्य प्रा. गया नागोराव, प्रा.संजय रणखांबे यांनी दोन महिने परिश्रम घेतल्याबद्दल अभिनंदन केले. विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मेश्राम यांनी स्व अनुभव सांगत विविध कला प्रकाराची माहिती सांगितली. सांस्कृतिक विभाग अद्यावत करण्यासाठी काही सूचना देखील दिल्या. तसेच विद्यापीठाच्या  महोत्सवांमध्ये संघप्रमुख डॉ.  आर्या व डॉ.सोमनाथ किरवले यांच्यासह विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्यामुळे त्यांचेही याप्रसंगी अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयातील अधीक्षक श्री अशोक रोडे यांचीही उपस्थिती होती या यशाबद्दल महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षक कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !