MB NEWS-मनसेच्या वतीने अगळा वेगळा दिपोत्सव साजरा-वैजनाथ कळसकर

 मनसेच्या वतीने अगळा वेगळा दिपोत्सव साजरा-वैजनाथ कळसकर 

आज दि 26/10/2022 बुधवार रोजी सायंकाळी ठिक 7:00 वाजता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आयोजित परळीशहरातील छत्रपति शिवाजी महाराज चौकात दीपोत्सव साजरा करण्यात आला.

     महाराष्ट्र नवनिर्माण सेना परळी शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या दीपोत्सव कार्यक्रमात त्यांच्या काव्यातुन साकारलेल्या ओमकार

एक दिवा त्यांच्यासाठी..!

ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात

आपल बलिदान दिलं, त्या सर्व भूमिपुत्र हुतात्म्यांसाठी.

एक दिवा त्यांच्यासाठी..!

जे भारतमातेच्या संरक्षणासाठी, सीमेवर शहीद झाले 

त्या आपल्या वीर जवानांसाठी.

एक दिवा त्यांच्यासाठी..!

जे ऊन..वारा..पावसात.. अस्मानी संकटांना तोंड देत, 

आपल्यासाठी शेतात..राबराब राबतात 

त्या अन्नदात्या शेतकरी..शेतमजूर बांधवांसाठी 

एक दिवा त्यांच्यासाठी..!

जे देशांतर्गत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील 

याची दिवसरात्र काळजी घेत, कोरोना काळात आपल्याला ज्यांनी मदत केली त्या सर्व पोलीस बांधवासाठी. 

एक दिवा त्यांच्यासाठी..!

ज्यांनी चोवीस तास न थकता न दमता उपाशी राहून स्वतःच्या जीवाची परवा न करता कोरोना काळात 

हजारो लोकांचे जीव वाचवले

त्या सर्व डॉक्टर..नर्स..फार्मासिस्ट बांधवासाठी.

एक दिवा त्यांच्यासाठी..!

ज्यांनी कोरोना काळात आपल्या जवळची व्यक्ती गमावली त्या सर्व भारतीय परीवारांसाठी

एक दिवा त्यांच्यासाठी..!

ज्यांनी कोरोना काळात चोवीस तास आपल गांव..आपल शहर..सॅनीटाईज करून स्वच्छ ठेवण्यात मोलाच कार्य केल त्या सर्व स्वच्छता कर्मचारी बांधवांसाठी. 

एकदा उजळू द्या असंख्य दिव्यांनी आपल अंगण..आसमंत..

देव देश अन धर्मासाठी.

 यावेळी मनसेचे बीड जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय दहीवाळ,जिल्हा सचिव रवी नेमाने ,तालुकाध्यक्ष श्रीकांत पाथरकर, तालुका उपाध्यक्ष विठ्ठल झिलमेवाड, शहर उपाध्यक्ष प्रशांत कामाळे,गणेश चव्हाण, महेश शिवगण, सुमित कलशेट्टे, रुषीकेश बारगजे, माणिक लटींगे,डाॅ.रामलींग घनचेकर, शहर सचिव डॉक्टर आशोक मंत्री, व मनसैनीक अदी उपस्थितीत होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार