MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी बीड तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांची केली पाहणी

 पंकजाताई मुंडे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसले !



सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्याची  मागणी


पंकजाताई मुंडे यांनी बीड तालुक्यात नुकसान झालेल्या  पिकांची केली पाहणी


बीड । दिनांक १९।

परतीच्या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून सोयाबीनसह अन्य पिकांची प्रचंड नासाडी झाली आहे, अशा संकटात शेतकऱ्यांना सावरण्यासाठी राज्य सरकारने नुकसानीचे सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी केली आहे. तालुक्यातील जाधववाडी शिवारात नुकसानग्रस्त शेती पिकांची आज पाहणी करून पंकजाताई मुंडे यांनी शेतकऱ्यांचे अश्रू पुसले आणि त्यांना मदतीचा विश्वास दिला.


   जिल्हयात झालेल्या परतीच्या पावसाने काढणीला आलेल्या शेतातील पिकांची अक्षरशः माती झाली आहे, शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे. अशा संकटात शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी पंकजाताई मुंडे यांनी आज मांजरसुंबा-पाटोदा रस्त्यावरील जाधववाडी शिवारात शेतात जाऊन पिकांची पाहणी केली. पावसामुळे शेतात अक्षरशः पाण्याचे तळे साचले असून पिके पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे विदारक चित्र त्यांना पहावयास मिळाले. यावेळी नुकसानीची माहिती त्यांनी तहसीलदारांकडून जाणून घेतली.

● हे देखील पहा:

🏵️ *जेंव्हा प्रवासात पंकजा मुंडे स्वतःच चहा बनवत कार्यकर्त्यांसमवेत घेतात आस्वाद.* *#mbnews#subscribe #like #share# comments*



🔴 *पंकजा मुंडेंचे नाव घेत सुषमा अंधारेंचा भाजपवर हल्लाबोल.* *#mbnews#subscribe #like #share #comments*


*ताईंना पाहताच शेतकऱ्याला रडू कोसळले*

-------------  

शेतीतील नुकसानीची माहिती देत असताना भारत जाधव नावाच्या शेतकऱ्याला अक्षरशः रडू कोसळले. "ताई, आमच्यावर आभाळच कोसळलयं..लई नुसकान झालयं..आता जीवाचं बरं वाईट केल्याशिवाय पर्याय नाही. या संकटातून आता तुम्हीच आम्हाला बाहेर काढा असं म्हणत हा शेतकरी ओक्साबोक्शी रडू लागला. पंकजाताईंनी त्याला धीर देत सावरले. असं काही करू नका..धीर धरा..सरकार नक्की मदत करेल, मी तुमच्या पाठिशी आहे असा विश्वास दिला.


 ● हे देखील पहा: EXCLUSIVE: पंकजा मुंडे | महत्त्वपूर्ण सहा प्रश्न आणि त्यावर व्यक्त झालेली मते |* *#mbnews #subscribe #like #share #comments*


सरसकट पंचनामे करा

--------------

शेतकरी हताश आणि निराश आहे.  अशा संकटात त्याला आधार दिला गेला पाहिजे. नुकसान मोठे आहे, सरसकट पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी तसेच महामार्गाच्या लगत असलेल्या शेतात निकृष्ट नाली बांधकामामुळे शेतात पाणी साचून पिकांचे नुकसान झाले आहे, यात दोषी कंत्राटदारावर कारवाई व्हावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी पत्रकारांशी बोलतांना केली. पीक विम्याच्या बाबतीत जिल्हयावर अन्याय होत आहे, पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालावे. विमा कंपनीला सरकारच्या आदेशाचे पालन करावेच लागेल असंही त्या म्हणाल्या.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार