MB NEWS-सरकार आपलं, विश्वास ठेवा* *खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचा विश्वास

 प्रशासनाला सोबत घेवून केज तालुक्यात खासदार शेतकर्‍यांच्या बांधावर...विमा कंपन्यांनी मनमानी करू नये, सरकार आपलं,  विश्वास ठेवा



खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांचा विश्वास

बीड(प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने हाहाकार उडवला असताना जिल्ह्याच्या खा. डॉ.प्रितमताई गोपीनाथ मुंडे ह्या मात्र पडत्या पावसात शेतकर्‍यांच्या बांधावर जावून पाहणी करताना दिसतात. एवढेच नाही तर संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना धीर देण्याची मोहिमही त्यांनी हाती घेतली. काल केज तालुक्यात होळ, लाडेगाव, ढाकेफळ परिसरात नुकसानीची पहाणी करताना शेताचे तळे झाल्याचे याचि देहि, याचि डोळा त्यांना दिसले. लोकांच्या डोळ्यातील आश्रू बरंच काही बोलून जात होते. अशा संकटात खासदारांनी मात्र सरकार आपलं आहे, निश्चित मदत करील. जिल्हा प्रशासनाने पंचनाम्याच्या भानगडीत न पडता सरसकट शेतकर्‍यांना मदत करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. दरम्यान विमा कंपन्यांच्या विरोधात खासदारांचा संताप दिसुन आला.

बीड जिल्ह्यात मागच्या आठ दिवसापासून परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला. सर्व तालुक्यात प्रचंड पडत असलेल्या पावसाने खरीपाचं कुठलंही पीक आता पदरात पडू शकत नाही अशी परिस्थिती या संकटात स्वत: भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे जिल्ह्यात तीन दिवसापासून अतिवृष्टीची पहाणी करताना दिसतात तर खा.डॉ.प्रितमताई मुंडेंनी आष्टी, पाटोदा तालुक्याचा दौरा केल्यानंतर काल केज तालुक्यात गुरूवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी शेतकर्‍यांच्या बांधावर जावून केली. आतापर्यंतच्या इतिहासात कधीच एवढा पाऊस झाला नाही. शेतीला तळ्याचं स्वरूप प्राप्त झालं. सोयाबीन, कापसाचे पीक 100 टक्के नेस्तनाबूत झाल्याचं चित्र समोर येत आहे. वरील गावात ठिकठिकाणी पहाणी केल्यानंतर शेतकर्‍यांच्या सोबत खासदारांनी संवाद साधला. दिपे वडगावात शेतकर्‍यांच्या समोर बोलताना त्यांनी विमा कंपनीच्या मनमानी कारभाराविरूद्ध संताप व्यक्त केला. शेतकर्‍यांना अ‍ॅप वगैरे काही गोष्टी सांगू नका. आम्हाला सरसकट विमा दिला पाहिजे अशा सुचनाही त्यांनी सोबत असलेल्या प्रशासनाला केल्या. शेतकर्‍यांची मानसिकता, कालवंडलेली चेहरे पाहून धीर देताना खासदारांनी विश्वास दिला. तुम्ही घाबरू नका, राज्यात शेतकर्‍यांचे हित जोपासणारं सरकार आहे. सर्वांना सरसकट मदत मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हा शब्द त्यांनी दिला. बीड जिल्ह्याला विशेष बाब म्हणून तात्काळ आर्थिक मदत करावी अशा मागणीचे पत्रही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ खडसे यांना पाठवले आहे. 

हार-तुरे घेतले नाहीत 

दरम्यान शेतकरी संकटात असल्याने कुठल्याही स्पॉटवर अथवा गावात खासदारांनी हार-तुरे स्विकारले नाहीत. त्यामुळे त्यांच्यातली संवेदनशीलता सामान्य जनतेच्या सुखदु:खात कशी मिसळलेली  असते? हे लक्षात आलं. या दौर्‍यात त्यांनी तहसिलदार, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी, तलाठी, मंडळ निरीक्षक यंत्रणेला सोबत घेतले होते. काही महत्वाच्या सुचनाही केल्या. सरकारकडून मदत आल्यानंतर पुन्हा गावात येवून हार-तुरे स्विकारेल हा विश्वास त्यांनी शेतकर्‍यांना दिला.

दरम्यान हा पहाणी दौर्‍यात भाजपाचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी,आरोग्य आघाडी अध्यक्ष डॉ.वासुदेव नेहरकर, रमाकांत मुंडे, सुनिल आबा गलांडे, अ‍ॅड. शरद इंगळे, सौ.योगिनीताई थोरात, तपसे काका, नेताजी शिंदे, हिंदुलाल काकडे, मधुकर काचगुंडे आदी प्रमुख कार्यकर्त्याची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार