MB NEWS-_जलजीवन मिशनच्या कामाची निःपक्षपणे चौकशी व्हावी_

 जलजीवन चौकशीची तक्रार करणाऱ्या तक्रारदारा वरील हल्ला खपवून घेतला जाणार नाही - पंकजाताई मुंडे


_जलजीवन मिशनच्या कामाची निःपक्षपणे चौकशी व्हावी_


बीड । दिनांक २९।

जलजीवन मिशन मधील गैरप्रकाराबाबत तक्रार करणाऱ्या संभाजी सुर्वे यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला दुर्दैवी आहे, असे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे. जलजीवनच्या कामाची सखोल आणि निःपक्ष चौकशी झाली पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे.


   जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. या योजनेच्या कामात मोठया प्रमाणात अनियमितता, भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे एक पथक पांगरी येथे गेले असता तेथे पथकात सहभागी असलेले तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते संभाजी सुर्वे यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला, हा प्रकार अतिशय दुर्दैवी आणि निःपक्ष चौकशीला बाधा आणणारा आहे. पोलिस व संबंधित अधिकाऱ्यांनी यावर कडक कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा पंकजाताई मुंडे यांनी दिला आहे. या कामाची निःपक्ष चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. 

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !