MB NEWS-काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गेची निवड

 काँग्रेस अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गेची निवड





काँग्रेस अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शशी थरूर यांचा दारूण पराभव झाला आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे हे विजयी झाले असून ते काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत.17 ऑक्टोबरला झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीमध्ये 9385 जणांनी मतदान केले होते. यातील 416 मते बाद झाली होती. खर्गे यांना 7897 मते मिळाली तर थरूर यांना 1072 मते मिळाली.


काँग्रेस अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी म्हणजेच 19 ऑक्टोबरला पार पडली. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतमोजणीचा निकाल दुपारी 4 पर्यंत जाहीर करण्यात येईल असं सांगितलं जात होतं मात्र हा निकाल दुपारी दीडच्या सुमारासच स्पष्ट झाला. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर शशी थरुर यांच्या गटाचे सलमान सोज यांनी निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला. सोज यांनी केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या मतदानात गडबड झाल्याचा सोज यांनी आरोप केला होता आणि उत्तर प्रदेशातील सर्व मते अवैध ठरवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार