MB NEWS-परळीत 2 डिसेंबर रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

 परळीत 2 डिसेंबर रोजी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन



परळी.   येत्या 2 डिसेंबर रोजी परळीत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आदि क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या तसेच काम करीत असलेल्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती  संयोजक विकास वाघमारे यांनी केले आहे.

     परळी शहरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे पत्रकार भवन येथे 2 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता या शिबिराचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, लेखक, दिग्दर्शक, नाटककार रानबा गायकवाड हे या शिबिरास मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरामध्ये कार्यकर्ता कसा असावा? कार्यकर्ता बनण्यासाठी कोणत्या गुणांची आवश्यकता आहे? कार्यकर्त्यांना भाषणाची कला अवगत असावी. भाषण कसे करायचे? लोकांवर आपला प्रभाव कसा पाडायचा? विविध कार्यालयातील कामे कशी करायची. लोकांचे प्रश्न सोडत असताना ते कसे सोडवायचे. याबरोबरच विविध क्षेत्राशी निगडित माहिती या शिबिरामध्ये दिली जाणार आहे. शिबिरासाठी प्रवेश नोंदणी अगोदर करणे गरजेचे आहे.

     या  शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कार्यकर्ते, तरुणांनी संयोजक विकास वाघमारे तसेच विद्याधर सिरसाट यांच्याशी 90 28 348 358 तसेच 7721963532 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार