MB NEWS- *■महाराष्ट्र विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश* ◆ 5 वि शिष्यवृत्तीस 2 विद्यार्थी पात्र

 ■महाराष्ट्र विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश



◆ 5 वि शिष्यवृत्तीस 2 विद्यार्थी पात्र


परळी / प्रतिनिधी


परळी तालुक्यातील मोहा येथील महाराष्ट्र शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालयाने स्पर्धा परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवत इयत्ता 5 वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 2 विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहे.विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.


परळी तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारी शाळा म्हणून ओळखली जाणारी महाराष्ट्र माध्य व उच्च माध्य विद्यालय मोहा या शाळेतील कु.सलगरे तेजस्विनी नीलकंठ व कु.तारे श्रद्धा सुनील या दोन विद्यार्थिनीं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होत घवघवीत यश संपादन केले आहे. या यशाबद्दल या विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव,सर्व संचालक मंडळ, शाळेचे शिस्तप्रिय मुख्याध्यापक, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख तथा उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार