MB NEWS-रेल्वेची भन्नाट आयडिया; IRCTC ने आणली ‘उधारी’ ची सुविधा…

 रेल्वेची भन्नाट आयडिया; IRCTC ने आणली ‘उधारी’ ची  सुविधा…






ट्रॅव्हल नाऊ पे लेटर' सुविधेअंतर्गत, तुम्हाला तुमचे तिकीट बुक करताना रक्कम भरण्याऐवजी ही सुविधा निवडावी लागणार आहे.


प्रवास करण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. देशातील कानाकोपऱ्यात जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते मात्र कधी कधी आर्थिक अडचण जाणवते. आर्थिक समस्या आल्या की प्रवासाचे सगळेच नियोजन कोलमडून पडते. मात्र आता तसे होणार नाही. तुम्हाला संपूर्ण कुटुंबासह ट्रेनच्या फर्स्ट क्लासमध्ये प्रवास करायचा असेल किंवा देशातील कोणत्याही प्रीमियम ट्रेनने (Premium train) प्रवास करायचा असेल, पण बजेट नसेल तर टेन्शन घेऊ नका. तिकीट बुक करा आणि या तिकिटाचे पैसे प्रवासानंतर भरा.कारण आयआरसीटीसीने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या (E-commerce platform) या यशस्वी धोरणाचा फायदा घेण्यात येणार आहे. ‘ट्रॅव्हल नाऊ पे लेटर’  *(Travel Now Pay Later’)*  या सुविधेअंतर्गत तुम्ही कोणतेही पैसे न भरता रेल्वे तिकीट बुक करू शकणार आहात. त्यानंतर तुम्ही हे पैसे तुमच्या स्वतःच्या हिशोबानुसार देऊ शकणार आहात.

ट्रॅव्हल नाऊ पे लेटर’ सुविधेअंतर्गत, तुम्हाला तुमचे तिकीट बुक करताना रक्कम भरण्याऐवजी ही सुविधा निवडावी लागणार आहे. यासाठी CASHe ने आयआरसीटीसी सोबत भागीदारी करण्यात आली आहे.


ज्यावेळी तुम्हाला भाडे भरताना या सुविधेची निवड करता तेव्हा तुम्हाला भाडे भरण्यासाठी 3 ते 6 ईएमआयचा पर्याय मिळणार.


ईएमआय निवडून तुम्ही त्या वेळी तुमचे तिकीट न भरता पैसे देऊ शकता आणि भाडे नंतर देऊ शकणार आहात. प्रवाशांना ही सुविधा तत्काळ आणि सर्वसाधारण आरक्षणासाठीही वापरता येऊ शकणार आहे.

CASHe सोशल लोनचा भाग वापरून वापरकर्त्यांची जोखीम प्रोफाइल तपासली जाते आणि त्यावर आधारित प्रवाशांना कर्ज वितरित केले जाते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, यासाठी एआय आधारित तंत्रज्ञानाचा वापर केला जातो .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार