– नौशाद उस्मान यांनी लिहिलेला विशेष माहितीपूर्ण लेख.....

इमेज
  काय असतो मुहर्रमचा आशुरा?             – नौशाद उस्मान                सध्या इस्लामी दिनदर्शिकेतील मुहर्रम महिना सुरू आहे. मुहर्रम हा अरबी कॅलेंडरचा पहिला महिना असल्याने इस्लामी नववर्षाची सुरुवात याच महिन्यापासून होते. मात्र पाश्चिमात्य संस्कृतीप्रमाणे नवीन वर्ष साजरे करण्याची परंपरा इस्लाममध्ये नाही.        मुहर्रमपासून हिजरी सन १४४८ ची सुरुवात झाली आहे.               मुहर्रम महिन्याच्या दहाव्या दिवशी "आशुरा" असतो. कॅलेंडरमध्ये "आशुरा" असे लिहिलेले पाहून अनेक मुस्लिमेतर बांधवांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, हा दिवस नेमका कोणता आहे? भारतीय उपखंडात मुहर्रमच्या निमित्ताने काही रूढी, परंपरा आणि प्रथा पाळल्या जात असल्याने अनेकांना हाच संपूर्ण प्रकार म्हणजे आशुरा असावा असे वाटते. परंतु वास्तवात आशुरा हा एक ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असलेला दिवस आहे. इस्लाममध्ये केवळ दोन सण साजरे करण्याचा आदेश आहे—ईद-उल-फित्र (रमजान ईद) आणि ईद-उल-अजहा (बकरी ईद). या दोन सणांव्यत...

MB NEWS-जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची बीड येथे विटंबना

 जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची बीड येथे विटंबना



पुतळा विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा : वीरशैव समा परळीच्या वतीने उप जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


परळी वैजनाथ /प्रतिनिधी


 बीड येथे जगद्ज्योती थोर समाज सुधारक महात्मा बसवेश्वर महाराजांच्या  पुतळ्याची अज्ञात समाजकंटकांनी विटंबना केली. या घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवार दिनांक 1 नोव्हेंबर रोजी वीरशैव समाज व बस्वप्रेमी परळीच्या वतीने  उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांना निवेदन देण्यात आले. जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.


उपजिल्हाधिकारी परळी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बीड शहरात सोमवार दि. ३१ ऑक्टोंबर २०२२ रोजी  महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याच्या परिसरातील ग्रील व कोनशिलेची अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड करुन नासधूस केली आहे. यामुळे बीड जिल्ह्यातील वीरशैव समाजात संतापाची लाट निर्माण झाली आहे. यापुर्वीही येथे असे प्रकार घडलेले आहेत यामुळे समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार होत आहेत. थोर समाजसुधारक जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा परिसरातील या प्रकारात आरोपी असलेल्या समाजकंटकांना त्वरित अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल या मागणीसाठी समस्त वीरशैव समाज परळी वैजनाथ तर्फे  निवेदन देण्यात आले आहे.

 बीड शहरात गेल्या महिनाभरात महात्मा बसवेश्वर महाराजांच्या  पुतळळ्याची विटंबना केल्याची ही दुसरी घटना आहे. या प्रकरणी परळी वीरशैव समाजाच्या व बस्वप्रेमी वतीने निषेध नोंदवत उपजिल्हाधिकारी परळी यांना आज मंगळवारी  निवेदन देण्यात आले. दरवेळी प्रशासनाकडून समाजकंटकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र आता आश्वासन नको, समाजकंटकांवर कडक कारवाईच करा असा आक्रमक पावित्रा वीरशैव समाज व बस्वप्रेमी बांधवांनी घेतला आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की महापुरुषांचा वारंवार अवमान करणार्‍यांना जेरबंद करा, यापुढे अशा घटना घडू नयेत म्हणून महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याजवळ सुरक्षा रक्षकाची नेमणूक करावी, पुतळ्याच्या चबुतर्‍याच्या फरशी व लोखंडची तोडफ ोड झाल्याने पुतळ्याचे पुन्हा नव्याने सुशोभिकरण करावे अशी मागणी परळी वीरशैव समाज व बस्वप्रेमी बांधवांनी केली आहे.  आश्वासन नको, समाजकंटकांवर थेट कारवाई करुन त्यांचा कायमचा बंदोबस्त करावा असा आक्रमक  पावित्रा परळी वीरशैव समाज व बस्वप्रेमी बांधवांनी घेतला आहे. यावेळी समाज बांधव व बस्वप्रेमी उपस्थित होते.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या