परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-विठ्ठल साखरे यांना पितृशोक

 मांडवा येथील माणिक साखरे यांचे निधन



विठ्ठल साखरे यांना पितृशोक


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- मांडवा  गावातील प्रतिष्ठीत नागरिक व वारकरी माणिक यादवराव साखरे (97) यांचे शुक्रवारी राहत्या घरी निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल साखरे यांचे ते वडील होत. 

   

   तालुक्यातील मांडवा येथील माणिक यादवराव साखरे यांचे शुक्रवार,दि.18 नोव्हेंबर  रोजी वृध्दपकाळाने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शनिवार, दि.19 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता मांडवा भागातील स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी माजी आ. संजय दौड व सामाजिक धार्मिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांसह  अधिकारी, कर्मचारी डॉक्टर, वकील, इंजिनिअर प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.  स्व. माणिक यादवराव साखरे हे मित्तभाषिक शांत, संयमी, स्वभावाचे व्यक्तीमत्व अशी त्यांची ओळख होती. ते नेहमी सर्वांशी आपुलकीने आणि जिव्हाळ्याने मिळून-मिसळून राहत होते. धार्मिक, सामाजिक कार्यात त्यांनी मोठा सहभाग घेतला होता. अत्यंत मिनमिळावू व सुस्वभावी असल्याने ते सर्वपरिचित होते. त्यांच्या निधनाने समाजातील भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विठ्ठल साखरे यांचे ते वडील होत. स्व.माणिक यादवराव साखरे यांच्या पश्चात एक मुले, पाच मुली , सुना, जावई, नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. 

           मांडवा येथे रविवारी सकाळी 7 वाजता राख सावडण्याचा कार्यक्रम होणार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!