परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या उदघाटनात विश्वास पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न

 यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आपण विसरत चाललो आहोत का?


यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या उदघाटनात विश्वास पाटील यांनी उपस्थित केला प्रश्न


अंबाजोगाई (प्रतिनिधी)--

यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आपण विसरत चाललो आहोत का?असा प्रश्न प्रख्यात साहित्यिक विश्वास पाटील यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती चव्हाण समारोहाच्या उदघाटनीय कार्यक्रमात उपस्थित केला. या वेळी व्यासपीठावर स्मृती समारोह समितीचे सचिव दगडू लोमटे, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे हे उपस्थित होते.



     अंबाजोगाई येथे गेली ३८ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाचे उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या विस्तारीत भाषणात विश्वास पाटील यांनी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या उदघाटनीय भाषणाची सुरुवात करतांना विश्वास पाटील यांनी या समारंभाला यांचे कौतुक करीत असा समारोह पश्चिम महाराष्ट्रात कोठेही होत नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या नावावर पश्चिम महाराष्ट्रातील अनेक कारखान्यांच्या चिमणीतुन मोठा धूर निघतो मात्र यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जागवण्याचे काम पश्चिम महाराष्ट्रात होत नाहीत याची खंत व्यक्त केली.




    आपल्या भाषणात विश्वास पाटील यांनी मुख्यमंत्री म्हणून काम करीत असतांना अनेक निर्णयांची त्यांनी यावेळी आठवण करून दिली.यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला दिशा देण्याचे काम केले. आपल्या कार्यकाळात घेतलेले अनेक निर्णय राज्यातील सामान्य माणसांना न्याय देणारे घेतले.१९७६ साली धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा कायदा यशवंतराव चव्हाण यांनी अंमलात आणला आज या कायद्याची संपुर्ण भारतात अंमलबजावणी होत आहे.



       यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना आपण विसरत चाललो आहोत का? असा प्रश्न अलिकडे आपल्याला पडत आहे. ज्या सामान्य माणसाच्या कल्याणासाठी यशवंतराव चव्हाण यांनी महत्त्वपुर्ण निर्णय घेतले त्याच सामान्य लोकांना आज आपल्या न्याय हक्कासाठी भांडावे लागत आहे. आज विद्यार्थी संख्या च्या आधारावर शाळा बंद करण्याच्या निर्णयावर त्यांनी टीका केली. २० विद्यार्थी संख्या असेल तर शाळा चालू अन्यथा बंद करण्याचा निर्णय चुकीचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. 



     विश्वास पाटील यांनी आपल्या विस्तारीत भाषणात त्यांनी लिहिलेल्या अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या मधील घटना आणि पात्रांची माहिती दिली. व अनेक ऐतिहासिक संदर्भ सांगितले.l

       कार्यक्रमाच्या प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात समारोह स्मृती समितीचे सचीव दगडू लोमटे यांनी मागील ३७ वर्षे घेण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमातुन यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जागर सुरू असल्याचे सांगितले. यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत आणि स्वातंत्र्य चळवळीत केलेल्या योगदानाचा जागर करण्यासाठी हा समारोह आयोजित करण्यात येतो असे सांगितले. यशवंतराव चव्हाण यांनी साहित्य, संगीत, सांस्कृती आणि राजकारण या क्षेत्रात घालुन दिलेला मापदंड आज ही कायम आदर्शवादी आहे. त्यांच्या विचारांचा हा जागर कायम ठेवण्यासाठी हा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह साजरा करण्यात येतो.



     या ३८ व्या समारोहाचे उद्घाटन विश्वास पाटील यांच्या हस्ते करण्यात येत असल्याचा आपल्या मनस्वी आनंद होतो आहे. विश्वास पाटील यांच्या सारखा सिद्धहस्त लेखकाच्या आणि एका वरीष्ठ सनदी अधिकाऱ्याच्या हस्ते हे उद्घाटन होणे ही आनंदाची बाब असल्याचे दगडू लोमटे यांनी सांगितले. यावेळी विश्वास पाटील यांचा परिचय अमृत महाजन  यांनी करुन दिला.



▪️आजचे कार्यक्रम

आज शनिवार, दि. २६ नोव्हेंबर २०२२ रोजी यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाच्या दुसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वा. बालआनंद मेळावा आयोजित केला असून सुप्रसिद्ध बालसहित्यकार प्रा. विनय आर. आर. पुणे हे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील व शालेय चित्रकला स्पर्धेचे विजेते यांना परितोषिके प्रदान करतील. पाहुणे म्हणून जागतिक कीर्तीचे शिल्पकार प्रदीप जोगदंड व रजनी वर्मा असतील. यावेळी सेलू येथील शिक्षक युवराज माने गुरुजी यांच्या 'गुरुजी, तु मला आवडतोस' या बाल साहित्य असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन केले जाईल. या वर्षी महाविद्यालयीन परीक्षेच्या पार्श्वभूमीवर शालेय चित्रकला स्पर्धा त्या त्या शाळेत घेतल्या जात आहेत. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. सायं. ७.३० वा. सुगम संगीताचे आयोजन केले आहे. औरंगाबाद येथील सुप्रसिद्ध गायक राजेश सरकटे यांनी संगीतबद्ध केलेला 'मराठवाड्याचे काव्य वैभव' ही संगीत रजनी सादर करतील. त्यात राजेश सरकटे, पायल सरकटे आणि संगीता भावसार हे गीत सादर करतील. प्रा. समाधान इंगळे यांचे निवेदक असतील. साथसंगत - कीबोर्ड - राजेश देहाडे, तबला - जगदीश व्यवहारे, ऑक्टोपॅड- राजेश भावसार, गिटार - संकेत देहाडे, ढोलक ढोलकी- अंकुश बोर्डे, मनोज गुरव - बासरी अशी असेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!