MB NEWS- ⭕ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर...
⭕ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर
पुणे, प्रतिनिधी....
मराठी रंगभूमीवरील विक्रमवीर अभिनेता प्रशांत दामले यांच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला आहे.
नाटक, चित्रपट आणि मालिका अशी तिहेरी मुशाफिरी करणाऱ्या प्रशांत दामले यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
टूरटूर या नाटकापासून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरील त्यांचा प्रवास सुरू झाला.
मोरूची मावशी, ब्रह्मचारी,
एका लग्नाची गोष्ट, शू.. कुठे बोलायचं नाही,
गेला माधव कुणीकडे, जादू तेरी नजर, साखर खालेल्ला माणूस, एका लग्नाची पुढची गोष्ट,
सारखं काहीतरी होतंय अशा नाटकांमधून दामले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने प्रशांत यांचा १२ हजार ५०० वा प्रयोग रंगभूमीवर सादर होणार आहे.
संपूर्ण चित्रपटसृष्टीत नाटकांचे
१२ हजार ५०० प्रयोग करणारे ते एकमेव कलाकार आहेत.
त्यांच्या या मेहनतीची दखल घेत त्यांच्या कामाचं कौतुक म्हणून प्रशांत यांना
‘नाटक अकादमी पुरस्कार’
जाहीर करण्यात आला आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना याची माहिती दिली आहे.
त्यानांतर चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, ‘आपल्या सर्वांच्या अलोट प्रेमामुळे व आशीर्वादामुळे मला संगीत नाटक अकादमी पुरस्कार जाहीर झाला.
असच प्रेम असु दे.’
त्यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
चाहते त्यांच्या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा