MB NEWS-वर्धा येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर

 वर्धा येथील मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर









नागपूर : अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे ९६ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन फेब्रुवारीत वर्धा येथे होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी नरेंद्र चपळगावकर  यांच्या नावाची घोषणा आज (दि.८) करण्यात आली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक वर्धा येथे पार पाडली. यावेळी चपळगावकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. दरम्यान, स्वागताध्यक्षपदी माजी खासदार दत्ता मेघे यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाच्या संरक्षकपदाची जबाबदारी सागर मेघे यांनी स्वीकारली आहे. साहित्य संमेलन दिनांक ३, ४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत वर्धा येथील स्वावलंबी शाळेच्या भव्य पटांगणावर होणार आहे.

    नरेंद्र पुरुषोत्तम चपळगावकर हे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश आहेत.  वैचारिक लेखन करणारे एक संवेदनाशील व सत्त्वशील मराठी लेखक म्हणून त्यांची ख्याती आहे. न्यायाधीश होण्यापूर्वी ते सन १९६१-६२मध्ये ते लातूरच्या दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख होते.

२००७ साली विदर्भ साहित्य संघातर्फे संपन्न झालेल्या ८० व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या संरक्षकपदाची जबाबदारी दत्ता मेघे यांनी स्वीकारली होती. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची आणि संरक्षपदाची जबाबदारी पिता-पुत्राने एकाचवेळी सांभाळणे, ही अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासातली एक महत्त्वाची आणि अपूर्व घटना ठरणार आहे. 

वर्धा साहित्य संमेलनाच्या मार्गदर्शक पदाची जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वीकारली आहे. त्याचबरोबर विदर्भ साहित्य संघाच्या पदाधिकाऱ्यांसह वर्धा येथील साहित्यप्रेमी, कार्यकर्ते या साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी परिश्रम घेत आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार