MB NEWS-अभिनेते विक्रम गोखले यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली
अभिनेते विक्रम गोखले यांना पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली
ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले. शनिवारी (दि.२६) पहाटे सहा वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर गेल्या १५ दिवसांपासून पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विक्रम गोखले यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मोदींनी सोशल मीडियावर ट्विट करुन विक्रम गोखले यांना आदरांजली वाहिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ” विक्रम गोखले हे एक सर्जनशील अभिनेते होते. त्यांनी केलेल्या भूमिकांमूळे ते कायम लक्षात राहतील. त्यांच्या निधनाने दु:ख झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. ओम शांती.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा