परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-बेलंब्याचे प्रसिद्ध हलकी वादक साहेबराव कांबळे यांनी भरला सरपंच पदासाठी तर नामेदव गित्ते (अपक्ष) म्हणून अर्ज दाखल

 बेलंब्याचे प्रसिद्ध हलकी  वादक साहेबराव कांबळे यांनी भरला सरपंच पदासाठी तर नामेदव गित्ते (अपक्ष) म्हणून अर्ज दाखल




परळी वैजनाथ, प्रतिनिधी 

      तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या निवडणुकीत अनेक इच्छुक उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज सादर करत आहेत. तालुक्यातील महत्त्वपूर्ण ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या बेलंबा ग्रामपंचायतसाठी जीवनभर आपल्या हलगी वादनाने प्रसिद्ध असलेल्या साहेबराव कांबळे यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केला आहे.


Click:● *'गावचे कारभारी अन् चारचाकीची सवारी' | ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी|तहसीलला यात्रेचे रूप.* #mbnews#subscribe #comments#like #share


         बेलंबा ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे. यासाठी अनेक जण इच्छुक उमेदवार आपापले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. गावात आणि परिसरामध्ये जीवनभर हलगी वादक म्हणून प्रसिद्ध असलेले व सर्वांची सहानुभूती असलेले व्यक्तिमत्व म्हणून साहेबराव गोविंद कांबळे यांची ओळख आहे. त्यांनी सरपंच पदासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे. त्याचबरोबर नामदेव धोंडीराम गित्ते यांनी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अर्ज दाखल केला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक वैशिष्ट्यपूर्ण उमेदवारी अर्ज व ग्रामीण भागातील विविध क्षेत्रातील विशेष कार्य करणारे व्यक्ती या निवडणुकीत आपले उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. यापैकीच हलगी वादक म्हणून प्रसिद्ध असलेल्या साहेबराव कांबळे यांचा सरपंच पदासाठी चा अर्जही या निवडणुकीतील एक वैशिष्ट्य ठरले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!