इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-अभिमानास्पद :बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र अविनाश साबळेला अर्जुन पुरस्कार !

 अभिमानास्पद :बीड जिल्ह्याचा भूमिपुत्र अविनाश साबळेला अर्जुन पुरस्कार !




नवी दिल्ली- बीड जिल्ह्यातील आष्टीचा राष्ट्रीय खेळाडू अविनाश साबळे याला केंद्र सरकारचा मानाचा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. बीड जिल्ह्याच्या दृष्टीने ही अभिमानस्पद गोष्ट आहे.अविनाशचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

केंद्र सरकारने वेगवेगळ्या खेळ प्रकारासाठी दरवर्षी दिले जाणारे पुरस्कार जाहीर केले. यामध्ये टेनिसपटू अचंत शरथ कमल याला मानाचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळणारा यावर्षी तो एकमेव खेळाडू ठरला आहे.भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहित शर्मा याकर गुरु दिनेश लाड यांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे.

सीमा पुनिया (अथलेटिक्स), एल्डोस पॉल (अथलेटिक्स), अविनाश मुकुंद साबले (अथलेटिक्स), लक्ष्य सेन (बॅडमिंटन), एचएस प्रणय (बॅडमिंटन), अमित (बॉक्सिंग), निकहत जरीन ( बॉक्सिंग), भक्ति प्रदीप कुलकर्णी (बुद्धिबळ), आर प्रज्ञानानंद (बुद्धिबळ), दीप ग्रेस एक्का (हॉकी), सुशीला देवी (जूडो), साक्षी कुमारी (कबड्डी), नयन मोनी सैकिया (लॉन बॉल), सागर कैलास ओवलकर (मल्लखांब), इलावेनिल वलारिवन (शूटिंग), ओमप्रकाश मिथरवाल (शूटिंग), श्रीजा अकुला (टेबल टेनिस), विकास ठाकुर (वेट लिफ्टिंग), अंशु (कुस्ती), सरिता (कुस्ती), परवीन (वुशु), मानसी गिरीशचंद्र जोशी (पॅरा बॅडमिंटन), तरुण ढिल्लन (पॅरा बॅडमिंटन), स्वप्निल संजय पाटिल (पॅरा स्विमिंग), जेरलिन अनिका जे (डेफ बॅडमिंटन).




द्रोणाचार्य पुरस्कार (नियमित श्रेणी प्रशिक्षकांसाठी): जीवनजोत सिंह तेजा (नेमबाजी), मोहम्मद अली कमर (बॉक्सिंग), सुमा सिद्धार्थ शिरूर (पॅरा शूटिंग), सुजीत मान (कुस्ती).

जीवनजोत सिंह तेजा (नेमबाजी), मोहम्मद अली कमर (बॉक्सिंग), सुमा सिद्धार्थ शिरूर (पॅरा शूटिंग), सुजीत मान (कुस्ती).

द्रोणाचार्य पुरस्कार (लाईफटाईम कॅटेगरी): दिनेश जवाहर लाड (क्रिकेट), बिमल प्रफुल्ल घोष (फुटबॉल), राज सिंह (कुस्ती).

खेळांमध्ये लाईफटाईम कॅटेगरीत अचीव्हमेंटसाठी ध्यानचंद पुरस्कार: अश्विनी अकुंजी सी (अथलेटिक्स), धर्मवीर सिंह (हॉकी), बीसी सुरेश (कबड्डी), नीर बहादुर गुरुंग (पॅरा अथलेटिक्स).

राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार 2022: ट्रांस स्टेडिया इंटरप्रायजेस प्रायवेट लिमिटेड, कलिंगा सूचना प्रौद्योगिकी संस्थान, लद्दाख स्की आणि स्नोबोर्ड संघ.

मौलाना अबुल कलाम आझाद (MACA) ट्रॉफी: गुरु नानक देव विश्वविद्यालय, अमृतसर.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!