MB NEWS-नागरी सुविधांची कामे नीट न झाल्यास आंदोलनाचा इशारा*

 नगर परिषद प्रशासनाच्या विरुद्ध राष्ट्रवादीचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन



नागरी सुविधांची कामे नीट न झाल्यास आंदोलनाचा इशारा


परळी (दि. 30) - परळी येथील नगरपरिषद सभागृहाची पाच वर्षांची मुदत संपल्यानंतर सुमारे एक वर्षापासून नगरपरिषदेत प्रशासकराज सुरू आहे  एक वर्षापासून प्रशासक असलेले मुख्याधिकार यांच्या संथ व शिथिल कारभारामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असून नगरपरिषद प्रशासन नागरिकांच्या समस्यांची सोडवणूक करत नसल्याने आज नगरपरिषद परळी येथे माजी नगराध्यक्ष तथा गटनेते वाल्मीक अण्णा कराड यांच्या नेतृत्वात नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रकाशक एस ए बोंदर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.  


Click:● *'गावचे कारभारी अन् चारचाकीची सवारी' | ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी|तहसीलला यात्रेचे रूप.* #mbnews#subscribe #comments#like #share




या आहेत निवेदनातील प्रमुख मागण्या - 


१)PTR नाव नोंदणी साठी मालमत्तेच्या मूल्यांकनाच्या १% लावलेला अतिरिक्त जाचक शुल्क तात्काळ रद्द करणे,तसेच नव्याने मालमत्ताकरात वाढविलेले स्वच्छ्ता कर व अग्निशमन कर कमी करणे

२)शहरातील डासांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे साथीचे रोग व व्हायरल झालेल्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे त्यासाठी तात्काळ फवारणी,ॲबेटिंग यासह आवश्यक ती सर्व अंमलबजावणी करणे.स्वच्छतेकडे अधिक काटेकोरपणे लक्ष देणे.

३)शहरातील अनेक प्रभागातील पथदिवे नादुरुस्त असून त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे सदरील पथदिवे तात्काळ दुरुस्त करणे.

४)शहरातील अनेक प्रभागातील विंधन विहिरी,हातपंप नादुरुस्त असून ते तात्काळ दुरुस्त करणे.

५)प्रधानमंत्री आवास योजना तथा रमाई आवास योजना मधील मंजूर DPR मधील लाभार्थ्यांना तात्काळ अनुदान वर्ग करणे,प्रलंबित प्रस्तावांना गती आणणे,घरकूल विभागातील वाढत चाललेल्या भ्रष्टाचाराला आळा घालणे,घरकूल बाबत पैशे घेणाऱ्या लाचखोर कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करणे.तसेच घरकूल लाभार्थ्यांना बांधकाम परवाना काढण्यासाठी लागणारा कर व्यपगत करणे.

६)शहरात विविध प्रभागात सिमेंट रस्त्यांची कामे युद्धपातळी झालेली असून अनेक ठिकाणी सबंधित कंत्राटदारांकडून ढापे बांधण्यात आलेले नसल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असल्याने सबंधित गुत्तेदारांना ढापा बांधणे चे आदेश निर्गमित करणे.

७)नागरी दलीत वस्ती योजनेचा निधी इतरत्र न हलवता प्रशासकीय मान्यता मिळालेल्या विकासकामांवरच खर्च व्हावी.

८)अनेक नागरिकांना नळाचे पाणी येत नाही तरीही नळपट्टी आकारली जात आहे अश्या नागरिकांची नळपट्टी व्यपगत करणे.


परळीतील नागरिकांच्या या प्रमुख समस्यांसह विविध प्रश्नांची सोडवणूक व्हावी या हेतूने राष्ट्रवादीच्या वतीने निवेदन देण्यात आले असून परळी विधानसभा मतदार संघाचे आमदार धनंजयजी मुंडे साहेब यांना पण सदरील निवेदनाची एक प्रत माहितीस्तव दिली गेली आहे. या निवेदनाची तात्काळ दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.


यावेळी वाल्मिकअण्णा कराड, बाजीराव धर्माधिकारी, रविंद्र परदेशी,केशव बळवंत,सुरेश टाक,अनंत इंगळे,रज्जाक कच्छी,श्रीकृष्ण कराड, विजय भोयटे,अन्वर मिस्कीन,अनिल आष्टेकर,संजय फड,जयराज देशमुख,जयप्रकाश लढ्ढा,माधवराव ताटे,दिनेश गजमल,अजिज कच्छी,नितीन रोडे,सय्यद सिराज,हाजी बाबा,गोविंद कुकर,ॲड.मनजीत सुगरे,लालाखान पठाण,केशव गायकवाड,रवि मुळे,अल्ताफ पठाण, वैजनाथ बागवाले, बालाजी चाटे,जालिन्दर नाईकवाडे,भिमराव डावरे,राजेंद्र सोनी,राजेश फड,,रमेश मस्के,नाजेर हुसेन,मुन्ना बगवाले, ॲड.सुरेश शिरसाट,अर्चना रोडे, पल्लवी भोयटे,बळीराम नागरगोजे,नितीन बागवालें,संजय देवकर,अमर रोडे,सय्यद अल्लाउद्दीन,बालाजी पवार,

धम्मा अवचारे,राजु शेख, शेख शम्मो,सचिन मराठे, राज हजारे,शंकर कापसे,मुन्ना मस्के,ज्ञानेश्वर होळंबे,राहुल जगतकर,राजकुमार डाके,प्रा.शाम दासुद,प्रताप समिंदरसवळे,नारायण मुंडे,शकील कच्छी,के.डी.उपाडे, मजास इनामदार,शरद कावरे,जितेंद्र नव्हाडे, राज जगतकर,निलेश वाघमारे,बापु गायकवाड, संतोष घोडके,राजु शेख,शेख मुख्तार,महिपाल सावंत, जानी खान,ज्ञानोबा मस्के,बली रोडे,भैय्यासाहेब आदोडे यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !