MB NEWS-●शेतकरी हिताचे ठराव मंजूर करत किसान सभेचे अधिवेशन उत्साहात

 ■कॉ. अँड.अजय बुरांडे यांची राज्य सहसचिव पदी निवड



●शेतकरी हिताचे ठराव मंजूर करत किसान सभेचे अधिवेशन उत्साहात 


परळी / प्रतिनिधी


अखिल भारतीय किसान सभेचे राज्य अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न झाले असून अनेक शेतकरी हिताचे ठराव या अधिवेशनात घेऊन ते संमत करण्यात आले.या अधिवेशनात किसान सभा बीड जिल्ह्याचे सचिव कॉ. एड.अजय बुरांडे यांची किसान सभेच्या राज्य सहसचिव पदी निवड करण्यात आली असून तरुण,अभ्यासू व जिल्ह्यातील लढाऊ नेतृत्व असलेल्या कॉ. बुरांडे यांच्या या निवडीचे शेतकरीवर्गात मोठा आनंद व्यक्त केला जात आहे.


अखिल भारतीय किसान सभेच्या 23 वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन अकोले जि. अहमदनगर येथे संपन्न झाले.या अधिवेशनात हमी भावाचा कायदा, विज विधेयक,पिक विमा योजना ही शेतकरी हिताची व व्याप्ती वाढवणारे असावी दर्जेदार व चांगल्या प्रतीचे सातत्याने संशोधन करून कीड प्रदुर्भाव रोखणारे बियाणे शेतकऱ्यांना पुरवण्यात यावे, शेतकरी हिताचे आयात निर्यात धोरण केंद्र सरकारने राबवावे, वनाधिकार कायद्याचे अंमलबजावणी करून वाहणारे आदिवासींच्या नावे पट्टे करण्यात यावे असे शेतकरी हिताचे ठराव घेण्यात आले.राज्यातील अतिवृष्टी अनुदान प्रत्येक विमा प्रश्नावर 23 ते 26 नोव्हेंबर या काळात राज्यभरात व्यापक आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला.


या अधिवेशनात राज्य सरचिटणीस पदी कॉ. डॉ. अजित नवले यांची पुनर्निवड करण्यात आली तर अध्यक्षपदी कॉ. उमेश देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. पीक विमा व शेती प्रश्नावर सातत्याने बीड जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांना सोबत घेऊन निदर्शने, आंदोलने व वेळी कायदेशीर मार्गाने लढवून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविणारे,सण 2018 च्या पीक विमा प्रश्नावर पुण्यातील कृषी आयुक्त व विमा कंपनी समोर 20 दिवसापेक्षा अधिक काळ ठिय्या मारून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना कोट्यवधीचा विमा मंजूर करून त्याच्या पदरात पडणारे बीड जिल्ह्यातील तरुण,अभ्यासू व लढवय्या नेतृत्व कॉ. एड.अजय बुरांडे यांची एकमुखाने बिनविरोध राज्याच्या सहसचिव पदी निवड करण्यात आली तर जिल्हा अध्यक्ष कॉ. मुरलीधर नागरगोजे यांची राज्य समिती सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.


कॉ. एड.अजय बुरांडे यांच्या या निवडीचे शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वारंवार रस्तावर येऊन,त्यांच्या खाद्याला-खादा देऊन त्याना न्याय मिळविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे व्यक्तिमत्त्व असलेले कॉ. बुरांडे यांच्या राज्य कमिटीवर झालेल्या या निवडीचे जिल्ह्यात किसान सभेचे काम जोमाने वाढण्याचे संकेत आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार