इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS- गंगाखेड शहरातील युवा पिढी घडवण्यासाठी आपण सर्वमिळुन सहकार्य करूया - रामप्रभु मुंढे

 गंगाखेड शहरातील युवा पिढी घडवण्यासाठी आपण सर्व मिळुन सहकार्य करूया - रामप्रभु मुंढे 

गंगाखेड प्रतिनिधी:-

           परभणी येथे काल क्रीडा संकुलन ग्राउंड येथे जिल्हास्तरीय जिम्नॅस्टिक आणि मलखांब स्पर्धेत आपल्या गंगाखेड तालुक्यातील 14 खेळाडू विभागीय स्पर्धेसाठी निवड झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना आज भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य रामप्रभु मुंढे यांच्या कार्यालय येथे सर्व विद्यार्थी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.!


             आपल्या गंगाखेड शहरातून तालुक्यातून जिम्नॅस्टिक व मलखांब सरावासाठी विद्यार्थ्यांचे अडचणदूर करण्यासाठी त्यांना लागणारे ०४ साहित्य पंचिंग मॅट मा.रामप्रभु मुंडे यांच्याकडून छोटीशी मदत म्हणून देण्यात आले.


श्री.धनराज सर यांच्या कडुन आजपर्यंत १२५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.


● जिम्नॅस्टिक मध्ये जिल्हास्तरीय पात्र विद्यार्थी ●

14 वर्षे वयोगट

1) शिवम मुंढे 

गोल्डन ड्रिम्स इंग्लिश स्कूल

2) आदित्य जंगले

जि. प. प्रा. शा. मन्नाथ नगर

3) ओमकार नागरगोजे &

4) आदीराज प्रधान

वेदांत मा. विद्यालय परळी रोड

5) विवेक राठोड 

आनंदवन विद्यालय गंगाखेड

6) अमर आंधळे

रुद्राक्ष क्रीडा मंडळ गंगाखेड

17 वर्षे वयोगट 

1) शंतनु साळवे 

जि. प्राशाला गंगाखेड

2) आदित्य लटपटे 

अहिल्यादेवी होळकर वि. डोंगरगाव

19 वयोगट 

1) प्रताप भावे 

छत्रपती विद्यालय माखणी


● मलखांब परभणी जिल्हास्तरीय पात्र विद्यार्थी ●

1)चंद्रकांत पवार (14 वयोगट)

2)ओमसाई लटपटे(14 वयोगट)

3)पृथ्वीराज मुळे (14 वयोगट)

4) रंगराव घुले (14 वयोगट)


यावेळी उपस्थित रामप्रभु मुंढे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र, मा.नगराध्यक्ष गंगाखेड, श्री.बालासाहेब पारवे नाभीक संघटना नेते, धनराज मुंडे सर (रुद्राक्ष क्रीडा मंडळ गंगाखेड), जगन्नाथ आंधळे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष, उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!