MB NEWS-जिल्हा परिषद कासारवाडी शाळेची विद्यार्थीनी शिष्यवृत्तीस पात्र!

 जिल्हा परिषद कासारवाडी शाळेची विद्यार्थीनी शिष्यवृत्तीस पात्र!



      मिरवट केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारवाडी येथील विद्यार्थीनी कु आरती तुकाराम गुट्टे हिने इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले असून शिष्यवृत्तीस ती पात्र ठरली आहे.

         ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटुंबातील आरतीने अनेक अडचणींना तोंड देत उत्तम अभ्यास केला. शाळेत अतिरिक्त तासांना ती हजर असायची, विविध स्पर्धा - उपक्रमात भाग घेण्याची तिला आवड आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत अभ्यासाबरोबरच गोष्टीची भरपूर पुस्तके वाचण्याची तिला अवड आहे. 

       शाळेचे मुख्याध्यापक श्री दादाराव राठोड, शिक्षक श्री चंद्रशेखर फुटके, श्री गंगाधर बिरमोड, श्रीमती प्रिया काळे, श्री तरुडे सरोजकुमार, श्रीमती शुभांगी चट यांचे तसेच परळी वैजनाथ येथील शिक्षक श्री सौदागर कांदे यांचेही तिला मार्गदर्शन लाभले. 

      थिंकशार्प फौंडेशनने पुरवलेल्या टॅबचा उपयोग सरावासाठी खूप छान झाल्याचे आरतीने सांगून श्री संतोष फड यांचे आभार मानले आहेत. 


     आरतीच्या या यशाबद्दल केंद्र प्रमुख श्रीमती मिश्रा, केंद्र मुख्याध्यापक श्री हडबे, गटशिक्षणाधिकारी श्री सोनवणे यांनी तसेच शालेय शिक्षण समिती अध्यक्ष व सदस्यांनी तसेच सरपंच व ग्राम पंचायत सदस्य कासारवाडी यांनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !