MB NEWS-जेष्ठ किर्तनकार मृदंगमहामेरु हभप ज्ञानोबा महाराज लटपटे यांना देवाज्ञा

   देश विदेशात शास्त्रीय व वारकरी संप्रदायिक मृदंगवादन पोहचवणारा व अनेक साधक घडवणारा निष्ठावंत वारकरी काळाच्या पडद्याआड!

जेष्ठ किर्तनकार मृदंगमहामेरु हभप ज्ञानोबा महाराज लटपटे यांना देवाज्ञा

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

        महाराष्ट्रातील  सर्वपरिचित नामवंत किर्तनकार व वारकरी संप्रदायातील मृदंगमहामेरु अशी ओळख असणारे हभप ज्ञानोबा(माऊली) महाराज लटपटे यांना  आज दि.१७ रोजी देवाज्ञा  झाली.मृत्युसमयी ते ८२ वर्षे वयाचे होते. त्यांच्या निधनाने मराठवाड्यातील आंतरराष्ट्रीय स्तरावर देश विदेशात शास्त्रीय , उपशास्त्रीय,वारकरी संप्रदायिक मृदंगवादन पोहचवणारा व अनेकांना घडवणारे निष्ठावंत किर्तनकार, मृदंगवादक, प्रशिक्षक काळाच्या पडद्याआड गेले आहे.

    हभप ज्ञानोबा(माऊली) महाराज लटपटे यांना तीन दिवसांपूर्वी ह्रदयविकाराचा त्रास झाला.त्यामुळे लातूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले..उपचारादरम्यान त्यांची आज गुरुवार दिनांक १७ रोजी प्राणज्योत मालवली.मुळ कोद्री ता. गंगाखेड येथील असलेले जेष्ठ किर्तनकार मृदंगमहामेरु हभप ज्ञानोबा महाराज लटपटे हे गेल्या अनेक वर्षांपासून परळी येथे रहिवाशी होते.


  परळी येथील हनुमान नगर भागात सध्या ते राहत होते.मातोश्री चंद्रभागा आश्रमच्या माध्यमातून ते वारकरी शिक्षण केंद्राचे संचालन करत होते.महाराष्ट्रातील सर्वपरिचित किर्तनकार व वारकरी संप्रदायातील मृदंगमहामेरु अशी त्यांची ओळख आहे. मृदंगवादनात त्यांचा हातखंडा होता.त्यांनी मृदंगवादनात असंख्य विद्यार्थी घडविले आहेत. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर देश विदेशात शास्त्रीय वारकरी संप्रदायिक मृदंगवादन त्यांनी पोहचवले.देश विदेशात त्यांचे असंख्य कार्यक्रम झालेले आहेत.तसेच त्यांनी घडवलेले असंख्य विद्यार्थी आज महाराष्ट्रात नामवंत किर्तनकार, मृदंगवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पश्वात पत्नी, दोन मुले,दोन मुली असा मोठा परिवार आहे.त्यांच्या निधनाने मराठवाड्यातील जेष्ठ किर्तनकार  हरवला आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे लटपटे कुटुंबावर व शिष्यपरिवारावर कोसळलेल्या या दुःखात एमबी न्युज परिवार सहभागी आहे.

•  परळीत होणार अंत्यसंस्कार

    दरम्यान, हभप ज्ञानोबा महाराज लटपटे यांच्या पार्थिवावर  शुक्रवार दि.१८ रोजी सकाळी १० वा. परळी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.






टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार