MB NEWS-न्यू हायस्कूल कॉलेज येथे संविधान दिन साजरा

 

न्यू हायस्कूल कॉलेज येथे संविधान दिन साजरा

संविधान दिनानिमित्त व्याख्यान, रॅली काढण्यात आली. यावेळी मार्गदर्शक व विद्यार्थी 


परळी (प्रतिनिधी) :- मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने (ता.२६) नोव्हेंबर शनिवार रोजी संविधान दिन विविध उपक्रम राबवुन साजरा करण्यात आला.



               शहरातील थर्मल कॉलनी येथील न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंचावर उपप्राचार्य सुनील लोमटे, प्रा.आर.एस. स्वामी, प्रा. सी.एम. ढेपे, प्रा. सी.एम बिराजदार,अमर देशमुख, आदी मान्यवर उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना संविधानाच्या प्रास्ताविकेची शपथ देऊन कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. 



यानंतर संविधान दिनानिमित्त प्रा. आर. एस. स्वामी यांनी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले. तर अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य सुनील लोमटे यांनी संविधानाचे महत्व पटवून देत काल,आज आणि उद्या संविधान किती महत्त्वाचे आहे. याविषयी उपस्थितांना माहिती दिली. न्यू हायस्कूल कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची थर्मल कॉलनी परिसरात संविधान दिनानिमित्त रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सिद्राम सोळंके यांनी केले. 


सूत्रसंचालन प्रा. आर.एम. कोकलगावे यांनी तर आभार प्रा. एस.एल मुंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अंकुश वाघमारे यांच्यासह सर्व प्राध्यापक, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !