MB NEWS-संविधानाचे जतन करणे ही काळाची गरज -गजानन दंदे

 संविधानाचे जतन करणे ही काळाची गरज -गजानन दंदे 



वडवणी/प्रतिनिधी

दिनांक 26 नोव्हेंबर रोजी दयानंद विद्यालय देवळा या ठिकाणी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री भागवत शिंदे सर तथा प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक राऊत सर उपस्थित होते. 

संविधानाविषयी बोलताना श्री दंदे सर यांनी किती आव्हानात्मक परिस्थिती स्वतंत्र्याप्राप्तीनंतर होती. त्याचे यथार्थ दर्शन घडवून आणले. त्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अखंड भारत ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी तत्कालीन संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान निर्माण केले. त्यामुळेच आज आपल्याला विविध प्रकारची स्वातंत्र प्राप्त झालेली आहेत. आजच्या संविधान दिनानिमित्त पुढे बोलताना ,या संविधान दिनानिमित्त  आपण त्याचे जतन केले पाहिजे जेणेकरून अखंड भारत ही संकल्पना अखंडितपणे बाधित राहील यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री साळवे सर, तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री शेंडगे सर ,कोकाटे सर ,रेडे सर, कदम सर ,मस्के सर, वाघमारे सर  खाडे सर  व सर्व शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार