MB NEWS-जमिनीच्या तुकड्यासाठी पुतण्या जीवावर उठला, चुलता ठार चुलती गंभीर; आरोपी गजाआड

 जमिनीच्या तुकड्यासाठी पुतण्या जीवावर उठला, चुलता ठार चुलती गंभीर; आरोपी गजाआड       



  नेकनूर,                  


 वडवणी तालुक्यातील पिंपरखेड येथील पुतण्याच्या हल्ल्याने ठार झालेल्या चुलत्याची घटना ताजी असताना लिंबागणेश जवळील मुळकवाडी येथे शेतीच्या वादातून पुतण्या रोहिदास विठ्ठल निर्मळ वय 50 याने केलेला हल्ल्यात चुलते बळीराम मसाजी निर्मळ वय 80 हे ठार झाले असून त्यांच्या पत्नी केसरबाई बळीराम निर्मळ वय 70 यांची प्रकृती गंभीर आहे .आरोपीला नेकनूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.                




       नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मुळकवाडी येथे शनिवारी सकाळी शेतीच्या वादातून रोहिदास विठ्ठल निर्मळ याने चुलताचुलतीवर राहत्या घरी सकाळी सात वाजता प्राणघातक हल्ला केला यामध्ये बळीराम निर्मळ आणि त्यांच्या पत्नी केसरबाई निर्मळ गंभीर जखमी झाल्या त्यांच्यावर उपचार सुरू असताना बळीराम निर्मळ यांचा मृत्यू झाला असून केसरबाई निर्मळ यांच्यावर बीड येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



 मृताचे मुले  नोकरी निमित्ताने बाहेर आहेत  पती-पत्नीच घरी  होते .हा शेतीचा वाद खुप जुना असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनास्थळी एपीआय शेख, पीएसआय जाधव, पानपाटील लिंबागणेश चौकीचे कॉन्स्टेबल सचिन डिडोळ,मुरूमकर यांनी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

दुर्दैवी घटना.....

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....नोकरीसाठी संघर्ष....भ्रष्ट व्यवस्थेचा बळी !