MB NEWS-महाराष्ट्र विद्यालय संकुलात संविधान दिन उत्साहात साजरा*

 महाराष्ट्र विद्यालय संकुलात संविधान दिन उत्साहात साजरा




परळी / प्रतिनिधी


महाराष्ट्र शिक्षण संस्था मोहा संचलित महाराष्ट्र विद्यालय मोहा संकुलात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी

महाराष्ट्र प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढून संविधान दिन दिनाची जनजागृती केली.


"यात तुझे हित आहे, यात माझे हित आहे अरे नादान माणसा, भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे."

हे विद्यार्थ्यांनी सादर करून सर्वाना मंत्रमुग्ध केले.

महाराष्ट्र माध्य व उच्च माध्यमिक विभागाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे जेष्ठ संचालक सुदाम शिंदे ,अध्यक्षस्थानी शाळेचे उपमुख्याध्यापक बुरांडे सर,पर्यवेक्षक राजमाने सर,जेष्ठ शिक्षक बोराडे सर,कुरे सर आदी उपस्थित होते.प्राथमिक शाळेच्या कार्यक्रम प्रसंगी  अध्यक्ष म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती जाधव मॅडम व प्रमुख पाहुणे म्हणून राजमाने सर हे उपस्थित होते.तर समाज कल्याण वसतीगृह येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राजमाने सर,गणगे सर,कुसुमकर सर,वसतीगृहाचे कर्मचारी बालासाहेब रुमाले आदी उपस्थित होते.या विविध कार्यक्रम प्रसंगी अनेकांनी मार्गदर्शन केले.विविध ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमाला सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार

नॅशनल क्रश, पुष्पाफेम अभिनेत्री रश्मीका मंदाना व रामायणातील सिता, अभिनेत्री क्रिती सनॉन गणेश महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास शनिवारी परळीत येणार