इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-संचिता संदिप टाक हिची बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर निवड

 संचिता संदिप टाक हिची बुद्धिबळ स्पर्धेमध्ये विभागीय स्तरावर निवड



देशासाठी खेळण्याचे उद्दिष्ट - संचिता टाक



परळी वैजनाथ(प्रतिनिधी)दि.26 - परळी येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये शहरातील संचिता टाक ही विजयी झालेली आहे.ती फाउंडेशन स्कूलची विद्यार्थिनी आहे.या विजयाने तिची निवड विभागीय पातळीवरील स्पर्धेसाठी झाली असून याबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक केले जात आहे.पोद्दार लर्न स्कुल येथे शुक्रवारी आयोजित तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.



यामध्ये 11 तालुक्यातील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला होता.यामध्ये 5 स्पर्धकांची निवड विभागीय स्पर्धेसाठी करण्यात आली.यामध्ये संचिता संदीपराव टाक या विद्यार्थिनींचा सहभाग आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष विजयप्रकाश तोतला,फाऊंडेशन स्कुल चे प्राचार्य दत्ता नरहारे सर,गजानन नागझरे सर,क्रीडा शिक्षक ओम मेनकुदळे,बुद्धिबळाचे प्रशिक्षक तपके,वर्गशिक्षक राहुल गुट्टे यांनी अभिनंदन केले आहे.


विश्वनाथ आनंद माझे आदर्श आहेत, भावाकडून बुद्धिबळ शिकले.शाळेतील शिक्षकांनी खेळासाठी प्रोत्साहन दिले म्हणूनच हे यश भेटले आहे.कुटूंबातील सदस्यांचे खेळासाठी पाठबळ असल्याचे संचिता ने सांगितले.पुढे देशासाठी खेळण्याचे उद्दिष्ट असल्याचेही ती म्हणाली यासाठी परिश्रम घेत असल्याचे तिने सांगितले.वडील संदीप टाक व संपूर्ण परिवाराने तिच्या या यशाचा आनंद व्यक्त केला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!